ठाणे : दिवा येथील साबेगाव भागात बुधवारी रात्री घरगुती गॅस सिलिंडरची गळती होऊन उडालेल्या आगीच्या भडक्यात दोन जण गंभीर जखमी झाले. प्रेरणा लांबे (४०) आणि शांतीलाल सोलंकी (४५) अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
साबेगाव येथे सीताबाई निवास इमारत आहे. या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर रिया देवळे या राहतात. त्या कामानिमित्ताने घराबाहेर गेल्या होत्या. बुधवारी रात्री ९.३० वाजतच्या सुमारास त्यांच्या घरातून सिलिंडर गळती झाल्याने गॅसचा दुर्गंध येऊ लागला. त्यामुळे त्यांच्या शेजारी राहणारे प्रेरणा आणि शांतीलाल यांनी त्यांच्या घराचा दरवाजा उघडला असता आगीचा भडका उडाला. या घटनेत प्रेरणा आणि शंतीलाल जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
First published on: 05-10-2023 at 10:04 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two people were injured in the fire that broke out due to cylinder leakage ysh