कल्याण – मुरबाड तालुक्यातील देवपे गावातील एका २७ वर्षाच्या तरुणाची दोन्ही हात तलवारीच्या साहाय्याने छाटून त्याला अपंग करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुन्ह्यातील दोन आरोपींना मुरबाड पोलिसांनी रविवारी रात्री अटक केले. हे प्रकरण खूप गांभीर्याने घेऊ नये आणि या गुन्ह्यातील आरोपींची पाठराखण भिवंडी लोकसभा मतदारसंघातील एक राजकारणी करत असल्याची जोरदार चर्चा मुरबाड परिसरात आहे.

मुरबाड तालुका पंचायत समितीचा माजी सभापती श्रीकांत धुमाळ याचा नातेवाईक अंकुश खारीक, नितीन धुमाळ यांना पोलिसांंनी अटक केली आहे. शुक्रवारी संध्याकाळी बारवी धरण परिसरात गंभीर जखमी तरुण सुशील भोईर (२७) याचे हात तलवारीने कापून टाकल्यानंतर माजी सभापती धुमाळ यांनी आपल्या सहकाऱ्याच्या मोबाईलवरून एका वजनदार राजकारण्याला संपर्क करून आपण ‘असा’ प्रकार केला आहे. या प्रकरणात सहकार्य करण्याची मागणी केली असल्याची चर्चा मुरबाड परिसरात आहे.

vitthal polekar murder
पुणे: अपहरणानंतर तासाभरात शासकीय ठेकेदाराचा निर्घृण खून, विठ्ठल पोळेकर खून प्रकरणात तिघे अटकेत; मुख्य सूत्रधार पसार
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Baba Siddiqui murder case Arrest of accused financial helper Mumbai
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण: आरोपींना आर्थिक मदत करणाऱ्याला अटक
government contractor killed over two crores extortion money
दोन कोटींच्या खंडणीसाठी शासकीय ठेकेदाराचा खून; ग्रामीण पोलिसांकडून एकास अटक; मध्य प्रदेशातून दोघे ताब्यात
husband of former BJP corporator, kidnapping,
पिंपरी : अपहरण, मारहाण प्रकरणी भाजपच्या माजी नगरसेविकेचा पती, माजी स्वीकृत सदस्यासह ११ जणांवर गुन्हा
Accused who escaped after killing friend arrested
मित्राचा खून करून पसार झालेला आरोपी गजाआड, ससून रुग्णालय परिसरात कारवाई
Koyta-carrying gangster arrested, gangster Tadipar,
पुणे : कोयता बाळगणाऱ्या तडीपार गुंडाला पकडले

हेही वाचा – प्रदूषण तपासणी केंद्रच चुकीच्या ठिकाणी; केंद्रांच्या जागेमुळे चुकीची आकडेवारी मिळत असल्याचा पालिकांचा दावा

या हल्ल्यात श्रीकांत आणि नितीन धुमाळ, खारीक आणि इतर तीन आरोपींचा सहभाग असल्याची गुन्ह्यात नोंद आहे. माजी सभापती श्रीकांत धुमाळ याच्या इशाऱ्यावरून हा हल्ला झाला असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. या हल्ल्याला मुरबाड परिसरात सुरू असलेल्या विकास कामांचे ठेके, पूर्ववैमनस्य आणि कौटुंबिक वादाची किनार असल्याचे स्थानिक ग्रामस्थांच्या चर्चेतून समजते.

फरार आरोपींना राजकीय आशीर्वाद असल्याने पोलीस या आरोपींना पकडण्यात टाळाटाळ करत असल्याचे तक्रादाराच्या नातेवाईकांनी सांगितले. फरार आरोपी हे अंबरनाथ परिसरातील आपल्या नातेवाईकांकडे लपून बसले असल्याची ग्रामस्थांची खात्रीलायक माहिती आहे. पोलिसांनी लवकरात लवकर सर्व आरोपींना अटक करून त्यांना कठोरात कठोर शिक्षा होईल, यादृष्टीने प्रयत्न करण्याची मागणी पीडित भोईर याच्या नातेवाईकांकडून केली जात आहे.

हेही वाचा – कल्याण : शहापूरजवळील समृद्धी महामार्गावरील उड्डाण पूल वाहतुकीसाठी खुला, शहापूर-किन्हवली-डोळखांबकडे जाणारी वाहने पुलावरून

पोलिसांंनी मात्र आम्ही फरार आरोपींचा शोध घेत आहोत. ते लवकर पकडले जातील, असे सांगितले. पीडित भोईर याच्यावर शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तो ठीक असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. देवपे गावचा सरपंच ते मुरबाड पंचायत समितीचा सभापती या राजकीय कारकिर्दीत आमदार किसन कथोरे यांनी श्रीकांत धुमाळ याला मोलाचे सहकार्य केले होते. अलीकडेच धुमाळ याने कथोरे यांचा गट सोडून दुसऱ्या गटात सामील होणे पसंत केले आहे.