कल्याण- येथील पश्चिम भागातील वन विभागाच्या वसाहती मधील ओम सिध्दी विनायक सुंकलमध्ये राहत असलेल्या एका सेवानिवृत्त ६५ वर्षाच्या रहिवाशाला त्यांच्या शेजारी राहणाऱ्या दोन बहिणींनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली आहे. मंगळवारी दुपारी हा प्रकार घडला आहे. चित्रा खाडे आणि तिची बहिण (रा. ओम सिध्दी विनायक संकुल, फॉरेस्ट कॉलनी, भूखंड क्र. ६३, कल्याण) अशी आरोपी महिलांची नावे आहेत. उत्तम कोमरु जाधव (६५) असे तक्रारदार ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> अरुंद नाला आणि गटारांअभावी डोंबिवलीतील रागाई मंदिर परिसर पाण्याखाली

पोलिसांनी सांगितले, मंगळवारी दुपारी तीन वाजता उत्तम जाधव यांच्या शेजारी राहणाऱ्या चित्रा खाडे व त्यांची मोठी बहिण यांनी उत्तम यांना तुम्ही सोसायटीतील सार्वजनिक भिंतीच्या ठिकाणी झाडांच्या कुंड्या ठेवण्यासाठी कट्टा का बांधला आहे, अशी विचारणा केली. उत्तम यांनी यासंदर्भात तुम्हाला कोठे तक्रार करायची आहे तेथे करा. त्याला मी उत्तर देईन, असे बहिणींना सांगितले. त्यानंतर उत्तम जाधव घरात गेले.

हेही वाचा >>> डोंबिवली जीमखान्या जवळील राज्य परिवहन महामंडळाच्या बस स्थानकात अंधार

थोड्या वेळाने चित्रा आणि तिची बहिण लोखंडी पहार घेऊन येऊन उत्तम यांचा दरवाजा ठोठावण्यास सुरुवात केली. त्यांनी उत्तम यांना घराबाहेर बोलविले. उत्तर यांनी बांधलेला कट्टा तोडण्यास सुरुवात करताच, चित्रा आणि तिच्या बहिणीने उत्तम यांना त्यांच्या वयाचा विचार न करता लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. उत्तम यांच्या गुप्तांगावर चित्रा व तिच्या बहिणीने लाथा मारल्याने त्यांना दुखापत झाली आहे. या दोन्ही महिलांच्या विरुध्द उत्तम जाधव यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.