लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील नेहरू रस्त्यावर गांजा विक्रीसाठी आलेल्या दोन जणांना रामनगर पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी अटक केली. त्यांच्याकडून दोन किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. हे दोघे डोंबिवली जवळील दिवा-साबे गावातील रहिवासी आहेत. पोलिसांनी या दोघा तस्करांवर गुन्हा दाखल करून त्यांचा तपास सुरू केला आहे.

साहिल लक्ष्मण बोराडे (रा. साबेगाव, जिवदानी नगर, दिवा पूर्व), प्रकाश गंगाराम जाधव अशी अटक आरोपींची नावे आहेत. साबे गावातील दोन तरूण डोंबिवली पूर्वेतील नेहरू रस्त्यावरील उद्यान भागात गांजा विक्रीसाठी येणार आहेत, अशी गुप्त माहिती रामनगर पोलीस ठाण्यातील हवालदार विशाल वाघ, उपनिरीक्षक केशव हासगुळे यांना मिळाली होती. या माहितीप्रमाणे पोलिसांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक अच्युत मुपडे यांनी पोलिसांची दोन पथके तयार करून शुक्रवारी रात्री नेहरू रस्ता भागात सापळा लावला.

आणखी वाचा-Badlapur Crime : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी महिलांचा संताप; “तुमचे १५०० रुपये आणि लाडकी बहीण योजना नको, त्यापेक्षा..”

रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान दोन इसम ठरल्या वेळेत नेहरू रस्त्यावर फिरू लागले. त्यांच्याजवळ एक खोका होता. पोलिसांनी त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले. बराच उशीर ते एकाच जागी रेंगाळू लागले. हेच ते आरोपी असल्याची खात्री मुपडे यांना पटल्या बरोबर सापळा लावलेल्या पोलिसांनी नेहरू रस्ता भागातील अंतर्गत गल्ल्यांमध्ये पोलीस उभे करून आरोपी पळून जाणार नाहीत अशी व्यवस्था केली. मुपडे यांच्यासह पोलिसांनी या दोघांना घेराव घातला. आपण पोलिसांच्या जाळ्यात अडकलो आहोत याची जाणीव होताच ते पळण्याचा प्रयत्न करू लागले. पण पोलिसांनी त्यांना चारही बाजूने घेरले.

पोलिसांनी साहिल, प्रकाश यांना रामनगर पोलीस ठाण्यात आणले. तेथे त्यांची झडती घेतली. त्यांच्या जवळील खोक्यात प्लास्टिकच्या पिशव्यात दोन किलोहून अधिक गांजाची पूड आढळून आली. त्याची बाजारातील किंमत २५ हजार रूपये आहे. गांजाची तस्करी केल्याने पोलिसांनी गुंगीकारक औषधद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे औषधद्रव्य अधिनियमाने तस्करांवर गुन्हा दाखल केला.

आणखी वाचा-Badlapur School Case: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “आरोपींना…”

त्यांना न्यायालयाच्या आदेशावरून पोलीस कोठडीत ठेवण्यात आले. हा गांजा साठा आरोपींनी कोठून आणला. ते त्याची कोणाला विक्री करणार होते. याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून डोंबिवलीत गांजाची तस्करी वाढू लागली आहे. भिवंडी आणि डोंबिवली जवळी गाव परिसरातून हा गांजा डोंबिवलीतील काही दुकाने, पाणटपऱ्यांवर ठेऊन तेथून तो तंबाखूसदृश्य म्हणून विक्री केला जात असल्याच्या तक्रारी आहेत. गांजाची ठाणे ते कर्जतपर्यंत तस्करी करणारा एक मोठा तस्कर डोंबिवली पश्चिमेत जुनी डोंबिवली परिसरात राहत असल्याची जोरदार चर्चा आहे. या तस्कराच्या माध्यमातून शहराच्या विविध भागात हा गांजा पुरवठा केला जात असल्याची चर्चा आहे.

आरोपींना अटक करण्याच्या कारवाईत हवालदार नीलेश पाटील, प्रशांत सरनाईक, सचिन भालेराव, सुनील शिंदे, दिलीप कोती, शरद रायते, मंगेश वीर, दत्तात्रय कुरणे, विशाल वाघ यांच्या पथकाने पार पाडली.