लोकसत्ता खास प्रतिनिधी
कल्याण: कल्याण शहराच्या दोन वेगळ्या भागात शाळेत जात असलेल्या दोन विद्यार्थ्यांच्या अंगावर दगड, संरक्षित भिंतीचा भाग कोसळून दोन्ही विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या पालकांनी याप्रकरणी बांधकामधारक, जमीन मालक यांच्या विरुध्द पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या आहेत.
कल्याण पश्चिमेतील अटाळी आंबिवली भागात खोका कंपनी जवळ पुष्पा राकेश वर्मा या आपल्या कुटुंबीयांसमवेत राहतात. या निवासाच्या बाजुला चौधरी सप्लायर्स नावाने दुकान आहे. या दुकानाच्या एका भिंतीचा भाग जीर्णजर झाला आहे. तो कधीही कोसळेल हे माहिती असुनही दुकान मालकाने त्या भिंतीची डागडुजी केली नाही. वर्दळीच्या रस्त्यावर ही निकृष्ट भिंत आहे.
जूनमध्ये तक्रारदार पुष्पा वर्मा आपला मुलगा कार्तिक याला घेऊन शाळेत पायी चालल्या होत्या. भास्कर शाळेजवळून जात असताना चौधरी सप्लायर्स दुकानाची भिंत तक्रारदार पुष्पा आणि मुलगा कार्तिक यांच्यावर अंगावर पडून ते गंभीर जखमी झाले. मुलगा कार्तिक, पुष्पा गंभीर जखमी झाल्या. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अनेक दिवस त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. रुग्णालयातून उपचार घेऊन सुटल्यावर पुष्पा सिंग यांनी चौधरी सप्लायर्सचे मालक आणि जमीन मालक यांच्या विरुध्द पोलीस ठाण्यात तक्रार केली. खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.
हेही वाचा… खड्डे एका महामार्गावर, वाहतूक कोंडी भलत्याच रस्त्यांवर…
शनिवारी दुपारी साडे बारा वाजता आई हेमा राजला शाळेत घेऊन पायी जात असताना चिंचपाडा रस्त्यावरील साई हाईट्स बांधकामाच्या ठिकाणाहून जात असताना, निर्माणाधिन बांधकामाच्या वरच्या मजल्यावरुन एक दगड वेगाने खाली येऊन तो राज याच्या डोक्यात पडला. रक्तस्त्राव सुरू झाल्याने त्याला तातडीने स्थानिक डाॅक्टरांकडून प्राथमिक उपचार करण्यात आले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला डोंबिवलीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर तेथे उपचार सुरू आहेत. साई हाईट्स बांधकामाचे व्यावसायिक यांच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला. त्यामुळे हेमा यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात साई हाईट्सच्या व्यावसायिका विरुध्द तक्रार केली आहे. कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.
हेही वाचा… कल्याण-डोंबिवलीतील रस्ते गणेशोत्सवापूर्वी सुस्थितीत करा, पालिका आयुक्तांचे आदेश
कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे सुरू आहेत. या बांधकामांचा सर्वाधिक फटका स्थानिक रहिवाशांना बसत आहे. अशाच प्रकारचे बेकायदा बांधकाम डोंबिवली पश्चिमेत देवीचापाडा येथे मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर काळुबाई मंदिरा जवळ जितू म्हात्रे, मुकेश म्हात्रे यांनी उभारले आहे. या बांधकामाच्या ठिकाणच्या घाणीमुळे आजुबाजुचे रहिवासी त्रस्त आहेत. या बांधकामांच्या ठिकाणचे मालवाहू उदवाहन कोसळण्याची भीती या भागातील रहिवासी, चालक, पादचाऱ्यांना वाटते. अशीच बांधकामे पी ॲन्ड टी काॅलनीमध्ये मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर सुरू आहेत. विशेष म्हणजे या बांधकामांमध्ये एका वाद्ग्रस्त निवृत्त अभियंत्यांची गुंतवणूक असल्याची चर्चा आहे.