कल्याण : येथील पश्चिमेतील पारनाका भागात शुक्रवारी रात्री बारा वाजताच्या दरम्यान भाजपच्या एका ६४ वर्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यावर दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी प्राणघातक हल्ला केला. लाथाबुक्की, पेव्हर ब्लाॅकने मारहाण झाल्याने ज्येष्ठ कार्यकर्ता गंभीर जखमी झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेमंत रघुनाथ परांजपे असे प्राणघातक हल्ला झालेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे. ते सेवानिवृत्त आहेत. ते कल्याणमधील भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. या मारहाणीवरून भाजप कल्याण विभागाच्या कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त करत हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. हेमंत परांजपे यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, शुक्रवारी रात्री आपण महेश जाधव यांच्या नातेवाईकाच्या लग्नाला गेलो होतो. तेथून प्रशांत देशमुख यांनी त्यांच्या मोटारीने आपणास दोन जणांना आपल्याला पारनाका येथील घरी सोडण्यास सांगितले. शुक्रवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास आपण घराजवळ उतरलो.

हेही वाचा…Kalyan Crime : कल्याणमध्ये परप्रांतीयांची पुन्हा मुजोरी; चिमुरडीच्या विनयभंगाचा जाब विचारणाऱ्या मराठी कुटुंबाला मारहाण

घराजवळ उभा असताना अचानक दोन व्यक्ति तेथे स्कुटरवर आल्या. त्यांचे चेहरे रुमालाने झाकले होते. दोन्ही अज्ञात इसमांनी आपणास, ‘काय रे लय माजलास काय. आमच्या दादाला शिव्या देतो काय. काही पण बोलतोस काय,’ असे बोलून दोघांनी आपणास शिवीगाळ करत ठोशाबुक्क्यांनी मारहाण करत जमिनीवर पाडले. लाथाबुक्क्यांनी मारहाण करत आपल्या पायावर सिमेंटचे पेव्हर ब्लाॅक मारून पायाला दुखापत केली. यावेळी आपण बचावासाठी आपण वाचवा वाचवा ओरडल्याने मारेकरी तेथून पळून गेले. हे दोन्ही मारेकरी २५ ते ३० वयोगटातील होते. शनिवारी सकाळी हेमंत परांजपे यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात जाऊन या मारहाण प्रकरणी तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे.

हेही वाचा…कल्याण पूर्वेत परप्रांतीय कुटुंबीयांकडून मराठी कुटुंबाला पुन्हा मारहाण, विनयभंग प्रकरणावरून जाब विचारल्याने घडला प्रकार

आपण रुग्णालयात उपचार घेत आहोत. आपणास सलाईन लावण्यात आले आहे. हेमंत परांजपे जखमी भाजप कार्यकर्ता, कल्याण. हा हल्ला भाजप कार्यकर्त्यावर नाही तर भाजपवर झाला आहे. या हल्ल्याचा सूत्रधार कोण. याप्रकरणातील आरोपींची सीसीटीव्ही चित्रणातून ओळख पटवून त्यांना १२ तासाच्या अटक करावी. अन्यथा भाजपतर्फे उग्र आंदोलन केले जाईल. भाजप कार्यकर्त्याकडे कोणी तिरप्या नजरेने पाहिल्यास त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल. वरुण पाटील शहराध्यक्ष, भाजप, कल्याण.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two unidentified assailants beat up senior bjp worker in parnaka area in west of kalyan sud 02