ठाणे : मुंबई नाशिक महामार्गावरील एका विरुद्ध दिशेने येणाऱ्या डम्परची दुचाकीला धडक बसली. या धडकेत दोन तरूणांचा मृत्यू झाला आहे. शैलेश हळदनकर (३५) आणि मुस्ताक अन्सारी (३५) अशी मृतांची नावे आहेत. दोघेही त्यांच्या कंपनीत जात होते. डम्पर चालकाचा नारपोली पोलीस शोध घेत आहेत.

कळवा येथील खारेगाव भागात शैलेश हळदनकर राहत होते. तर मुस्ताक हा गोवंडीमध्ये वास्तव्यास होता. दोघेही भिवंडीतील वस्त्र तयार करणाऱ्या कंपनीत कामाला होते. मुस्ताक हा शिवणकाम करत होता. तर, शैलेश त्याचा सहकारी आहे. सोमवारी सकाळी मुस्ताक आणि शैलेश दोघेही दुचाकीवरून कामाला जात होते. त्यावेळी मुस्ताक दुचाकी चालवित होता. ते मानकोली नाका परिसरात आले असता, या मार्गावर एका डम्पर चालकाने विरुद्ध दिशेने डम्पर चालवित त्यांच्या दुचाकीला धडक दिली. मुस्ताक आणि शैलेश दोघेही डम्परच्या दोन्ही चाकाखाली आले.

Accident
Accident News : सुरक्षेसाठी बसवलेली एअरबॅग ठरली जिवघेणी! वाशी येथे अपघातात ६ वर्षीय मुलाचा मृत्यू
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
liquor Nashik district, Illegal liquor stock Nashik district,
नाशिक जिल्ह्यात १५ लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त
two dead in tanker accident
जळगाव जिल्ह्यात टँकरच्या धडकेने दोन जणांचा मृत्यू
Will neutering leopards stop human leopard conflict
बिबट्यांच्या नसबंदीने मानव-बिबटे संघर्ष थांबणार का? हा उपाय व्यवहार्य आहे का?
Shocking video Suv overturned 8 times nagaur bikaner highway accident Live video
याला काय म्हणाल नशीब की चमत्कार? ८ वेळा पलटली SUV कार; समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
navi Mumbai in last few years accident and death decreased
पालिकेच्या परिवहन उपक्रमात अपघातांच्या संख्येत मात्र घट
Mumbai Nashik Highway Accident, Traffic jam Thane,
मुंबई नाशिक महामार्गावर अपघात, ठाण्यात वाहनांच्या रांगा; विद्यार्थी, नोकरदारांचे हाल

हेही वाचा – पिंपरी पोलिसातील हवालदाराचे होत आहे कौतुक, शरीर सौष्ठव स्पर्धेत मिळवले सुवर्ण पदक

हेही वाचा – ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात मंगल स्वरांच्या नामघोषात गणेशजन्म सोहळा

डम्परची चाके त्यांच्या शरिर आणि डोक्यावरून गेली. त्यामुळे दोघांचा मृत्यू झाला. घटनेनंतर डम्पर चालक फरार झाला. याप्रकरणी सोमवारी सायंकाळी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी घटनास्थळावरून डम्पर जप्त केला आहे. तसेच चालकाचा पोलीस शोध घेत आहेत.

Story img Loader