कल्याण – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी मुंंबईत येऊन घराणेशाहीवर टीका केली. ते चांगलेच आहे. पण घराणेशाहीविषयी वाटत असेल तर कल्याण लोकसभेत गद्दारांच्या घराणेशाहीचे तिकीट मोदीच कापतील आणि त्यांना कचऱ्यात फेकतील. ते काम त्यांच्याकडून झाले नाहीतर कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिवसैनिकांना गद्दारांच्या घराणेशाहीला कचऱ्यात फेकण्याचे काम करावे लागेल, असा विश्वास ‘उबाठा’चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी कल्याण लोकसभा दौऱ्याच्यावेळी शिवसैनिकांशी संवाद साधताना व्यक्त केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
कल्याण लोकसभा मतदारसंघातील अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, ग्रामीण, डोंबिवली, दिवा, मुंब्रा, कळवा भागातील शिवसैनिकांशी शाखा भेटीच्या माध्यमातून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी संवाद साधला. त्यांचे शिवसैनिकांनी जंगी स्वागत केले.
हेही वाचा – मुंबई महानगरात महायुतीचा ‘राम-सेतू’ पॅटर्न
इंडिया आघाडीची बैठक असताना आपणास शिवसैनिकांची भेट महत्वाची असल्याने आपण इंडिया आघाडीच्या नेत्यांना सांगून या पूर्वनियोजित दौऱ्यावर आलो आहोत, असे ठाकरे यांनी सांगितले. येत्या लोकसभा निवडणुकीत कल्याण लोकसभेचे महत्व अधिक आहे. गद्दारांच्या घराणेशाहीतील उमेदवार या मतदारसंघात आहे. या गद्दारांच्या घराणेशाहीच्या मुळावर घाव घालण्यासाठी आपण या दौऱ्याचे आयोजन केले. पंतप्रधान मोदींंनी मुंबईत शुक्रवारी घराणेशाहीवर टीका केली. ती गरज आहे. पण घराणेशाहीविषयी मोदींंना खरच काही वाटत असेल तर तेच कल्याण लोकसभेतील गद्दारांच्या घराणेशाहीचे तिकीट कापतील, या गद्दारांना ते कचऱ्यात फेकतील. ते काम मोदींकडून झाले नाहीतर येथल्या शिवसैनिकांना ते काम निष्ठेने करायचे आहे, असे आवाहन ठाकरे यांनी केले.
मोदी पुन्हा राज्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. आता मकर संक्रात आहे. तिळगुळ खाऊन गोड बोलण्यास सांगितले जाईल. येत्या लोकसभा निवडणुकीत हुकूमशाहीवर संक्रात आहे हे नक्की. कल्याण लोकसभेतील शिवसैनिक निष्ठावान आहे. हे सिताराम भोईर यांनी एका गद्दाराला यापूर्वी पाडून दाखवून दिले आहे. येथल्या शिवसैनिकांची आपणास चिंता नाही. ते कल्याण लोकसभेत गद्दारांना बरोबर गाडतील, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला.
आता साफसफाई जोरात सुरू आहे. पंतप्रधान मोदींनी कार्पोरेट सफाई केली. राज्यात पण भाजप आणि गद्दारांची सफाई निष्ठावान शिवसैनिक करील. प्रभूराम चंद्रांच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली की त्याच दिवशी शिवसैनिकांनी या गद्दारांना गाडण्याची शपथ घ्यायची आहे. हे पवित्र काम आपण नक्की पार पाडू, असा विश्वास ठाकरे यांंनी व्यक्त केला.
कल्याण परिसरातील शिवसैनिकांना यंत्रणांचा वापर करून अडचणीत आणण्याचे प्रकार सुरू आहेत. शिवसैनिकांना डिवचले तर मात्र मधाचे पोळे काय असते हे शिवसेना, भाजपने समजून घ्यावे. आतापर्यंत या पोळ्यातील मध खाऊन पळून गेला आहात याचे भान ठेवा. मधाचे पोळे येत्या निवडणुकीत तुम्हाला गाड्ल्याशिवाय राहणार नाही, अशा इशारा ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला.
आतापर्यंत ज्यांना जोपासले, मोठे केले तेच नागासारखे उलटले. नाग पवित्र असतो पण हे गांडुळ आहेत. आपल्याला यांना जागा दाखवून द्यायचीच आहे. यासाठी सज्ज राहा, असे आवाहन ठाकरे यांनी केले.
आपलाच उमेदवार विजयी
कल्याण लोकसभेत आपल्या पक्षाचा उमेदवार विजयी होईल. या विजयाची सभा अंबरनाथ शिवमंदिरासमोर घेतली जाईल, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला. शिवमंदिराचा विकास करताना बाजूचा दुर्गंधीयुक्त नाला यांना दिसला नाही का. तो नाला पण साफ करावा लागेल, अशी टीका ठाकरे यांनी खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्यावर केली.