ठाणे : दुसरीकडे असेल तर तो मळ आणि तुमच्याकडे आला तर तो कमळ, असा टोला लगावत भ्रष्टाचाऱ्यांची बुलेट ट्रेन सुसाट घेऊन जाणारा भाजप आता भ्रष्ट जनता पक्ष झाला आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी ठाण्यातील कार्यक्रमात केली. विश्वगुरू, महाशक्तीचा प्रमुख अशा नेत्याच्या राजवटीत मणिपुरमध्ये महिलांची अब्रु लुटली जात आहे असे ठाकरे यांनी नमूद करत, देशाच्या राष्ट्रपती महिला आहेत. त्यांना काही संवेदना आहेत की नाही? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

येथील गडकरी रंगायतन नाटय़गृहामध्ये पक्षाच्यावतीने हिंदी भाषी कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर टीका केली. राम मंदिरासाठी कायदा करा असे आम्ही सांगितले होते. राम मंदिरासाठी कायदा केला नाही. पण, लोकशाही संपविण्यासाठी कायदा करीत आहेत असा आरोप केला. मी मोदी किंवा कोणत्या व्यक्तीविरोधात नाही. मी हुकूमशाहीच्या विरोधात नक्की आहे.

आधी भारतात बाहेरच्या देशातून मुघल यायचे. बाबरही बाहेरच्या देशातून आला होता. त्यामुळेच तर आपण बाबरी मशीद पाडली. त्यानंतर इंग्रज आले. इंग्रजांशी लढताना आपल्या अनेक पिढय़ा मरण पावल्या. पण आपण लढत राहिलो. शेवटी इंग्रजांनाही आपला देश सोडून जाव लागले. आता आपल्या घरातलेच आपल्या डोक्यावर बसू पाहत आहेत. २०२४ ची संधी हुकली तर रेल्वे सुटली असेच समजावे लागेल. त्यानंतर आपला देश आपल्या हातून निसटून जाईल, असा इशारा त्यांनी दिला.