किशोर कोकणे लोकसत्ता

ठाणे : ठाकरे गटाच्या युवती सेनेच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांना मारहाण झाल्याचा दावा ठाकरे गटाकडून केला जात आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात येऊन ठाण्याचे  पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. परंतु ते कार्यालयातच उपलब्ध नव्हते. त्यामु‌ळे आयपीएस अधिकारी जयजीत सिंग नेमके आहेत तरी कोण ? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्याविषयी.

former ministers who rebel and won
अनेक माजी मंत्री, आमदारांचा बंडखोरी करून विजयाचा इतिहास, देशमुख, केदार, बंग, जयस्वाल आदींचा समावेश
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
traffic cleared due to police planning in Pune print news
पाेलिसांच्या नियोजनामुळे वाहतूक सुरळीत-पंतप्रधानांच्या सभेसाठी कडक बंदोबस्त
Hadapsar, NCP, Hadapsar latest news,
हडपसरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वर्चस्वासाठीची लढाई
Heavy police presence on the occasion of Prime Minister narendra modis visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त कडक पोलीस बंदोबस्त
Aditya Thackeray at mumbai first
मुंबईच्या विकासासाठी महापालिका, महापौरांना अधिक अधिकार हवेत; ‘मुंबई फर्स्ट’च्या कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांची भूमिका
Municipal corporation Thane, illegal hoarding holders Thane, illegal hoarding Thane,
ठाण्यात ५२ बेकायदा होर्डिंगधारकांना पालिकेच्या नोटीसा, १० कोटी ९६ लाखांचा दंड पालिका करणार वसूल

जयजीत सिंग हे १९९० च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी आहेत. मे २०२१ मध्ये त्यांना ठाणे पोलीस दलात पोलीस आयुक्त म्हणून पदभार मिळाला. मुंबई पोलीस दलानंतर ठाणे पोलीस दलातील आयुक्तांचे पद हे अधिक महत्त्वाचे मानले जाते. ठाण्यात पोलीस आयुक्ताचा पदभार स्विकारलेल्या पोलीस अधिकाऱ्यास बदलीनंतर मुंबई पोलीस आयुक्त पदाचा पदभार मिळत असतो असे समजले जाते. परमवीर सिंग, विवेक फणसळकर ही त्याची उदाहरणे.

महाविकास आघाडीची सत्ता असताना जयजीत सिंग यांच्यासह अनेक पोलीस अधिकाऱ्यांची नावे ठाणे पोलीस आयुक्तपदासाठी पुढे येत होती. परंतु या शर्यतीत जयजीत सिंग यांनी बाजी मारून ठाण्याचे आयुक्तपद भुषवले. ठाण्यात पोलीस आयुक्तपद मिळविण्यापूर्वी ते राज्याच्या दहशतवादी विरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख होते. त्यावेळी २०२१ मध्ये प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्याबाहेर स्फोटके सापडली होती. त्यानंतर अचानक ठाण्यातील उद्योगपती मनसुख हिरेण यांचा मृतदेह मुंब्रा खाडीत आढळला होता.

या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक झाली होती. या प्रकरणाचा सुरवातीचा तपासही दहशतवादी विरोधी पथकाकडे होता. तेव्हा जयजीत सिंग हेच प्रमुखपदी होते. मनसुख हिरेण यांच्या मृत्यूनंतर महाविकास आघाडीविरोधात भाजपकडून टिका केली जात होती. तसेच महाविकास आघाडीची सत्ताही संकटात आली होती. तर २००४ मध्येही त्यांनी दहशतावादी विरोधी पथकाचे उपायुक्तपद भूषवले होते. त्यांना टेक्नोसॅव्ही पोलीस अधिकारीही म्हटले जाते.  सध्या ठाणे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांनी विशेष अशी काही मोठी कामगिरी बजावलेली नाही. आयुक्तालयात त्यांच्या भेटीसाठी येणाऱ्या नागरिकांनाही अनेकदा ताटकळत बसावे लागत असल्याची चर्चा नागरिक करत असतात.