ठाणे : शिवसेनेतील फुटीनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे लोकसभा मतदार संघामध्ये पराभवाचा सामना करावा लागलेल्या ठाकरे गटाने आता विधानसभा निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यात आयोजित करण्यात आलेल्या भगवा सप्ताहाच्या माध्यमातून ठाकरे गटाने ठाणे जिल्ह्यात विविध उपक्रमांद्वारे मतदारांपर्यंत पोहचण्यास सुरूवात केली आहे. तसेच या सप्ताहाच्या माध्यमातून पक्ष सदस्य नोंदणी करण्याबरोबरच पक्षाचे मशाल चिन्ह घरोघरी पोहचविण्याची मोहीम हाती घेतल्याचे दिसून येत आहे. या भगव्या सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी,उद्या मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे.

शिवसेनेतील फुटीनंतर लोकसभेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे असा सामना रंगला होता. मुख्यमंत्री शिंदे हे ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते म्हणून ओळखले जातात. यामुळेच शिवसेनेतील फुटीचे केंद्रबिंदू म्हणून ठाणे जिल्ह्याकडे पाहिले जाते. यामुळे या मतदार संघातील निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले होते. ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला असून तो कुणाच्या ताब्यात राहणार हे ठरविणारी ही निवडणूक होती. या निवडणुकीत ठाकरे गटाचा पराभव करत मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाणे हे त्यांच्याच शिवसेनेचे असल्याचे स्पष्ट केले होते. या निवडणुकीतील पराभव ठाकरे गटाच्या जिव्हारी लागला असून त्यांनी या पराभवाचा बदला विधानसभा निवडणुकीत घेण्याचा चंग बांधला आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने मोर्चेबांधणी करत निवडणुकीची रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यात आयोजित करण्यात आलेल्या भगवा सप्ताहाच्या माध्यमातून ठाकरे गटाने ठाणे जिल्ह्यात विविध उपक्रमांद्वारे मतदारांपर्यंत पोहचण्यास सुरूवात केली आहे.

Raj Thackeray in Borivali
Raj Thackeray in Borivali : राज ठाकरेंना भर सभेत आला कॉल, मुंबईतील एक सभा अचानक रद्द; नेमकं काय झालं?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Aditya Thackeray cricket
ठाकरे बंधू खेळामध्ये रमले; प्रचारादरम्यान तरुणाईमध्ये मिसळले, क्रिकेट आणि फुटबॉल खेळत क्षणभर विरंगुळा
Raj Thackeray Slams Uddhav Thackeray in his Speech
Raj Thackeray : राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका, “बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते माझ्या शिवसेनेची काँग्रेस होताना दिसली तर..”
Raj Thackeray refrained from criticizing Aditya Thackeray in the Worli meeting Mumbai
वरळीच्या सभेत आदित्य ठाकरेंचा नामोल्लेखही नाही! राज ठाकरे यांनी टीका करणे टाळले
Raj Thackeray
Raj Thackeray : “सत्ता हातात द्या पहिल्या ४८ तासांत मशिदीवरचे भोंगे काढतो”, राज ठाकरेंचं वरळीतील सभेत विधान
Uddhav Thackeray Launch Vachanan Nama
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा वचननामा जाहीर, छत्रपती शिवरायांचं मंदिर, मोफत शिक्षण आणि काय काय वचनं?
devendra fadnavis criticisze uddhav thackeray by taking name of balasaheb thackeray
“अल्पसंख्याकांच्या मतांसाठी ठाकरेंनी बाळासाहेबांना … ” काय म्हणाले फडणवीस

हेही वाचा…ठाणे : पाचव्या मजल्यावरून पाळीव श्वान अंगावर पडल्याने मुलीचा मृत्यू, श्वान मालकाविरोधात गुन्हा दाखल

ठाकरे गटाकडून राज्यभरात भगवा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. ४ ऑगस्टपासून सुरू झालेला हा सप्ताह ११ आगॅस्ट रोजी संपणार आहे. या सप्ताहामध्ये विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामध्ये ज्येष्ठांचा सन्मान सोहळा, विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा, स्वस्त दरात कांद्याची विक्री, आरोग्य शिबिर अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे. याच उपक्रमांच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मतदारांपर्यंत पोहचण्यास सुरूवात केली आहे. तसेच घरोघरी पोहचून कार्यकर्ते मशाल चिन्ह मतदारांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. या सप्ताहाची अंमलबजावणी योग्यरित्या व्हावी यासाठी मतदारसंघ निहाय्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यास सुरुवात झाली आहे.

उद्या उद्धव ठाकरे ठाण्यात

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे भगव्या सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर उद्या ठाण्यात येणार आहेत. सायंकाळी ६ वाजता राम गणेश गडकरी रंगायतनात त्यांची सभा होणार आहे.

हेही वाचा…कल्याणमधील आधारवाडी तुरूंगात एका कैद्याचा दुसऱ्या कैद्यावर हल्ला

भगवा सप्ताह ही संकल्पना हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सुरु केलेली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचता यावे यासाठी उद्धव ठाकरे यांनी हा सप्ताह पुन्हा सुरु केला आहे. त्यानुसार, या सप्ताहाचे जिल्ह्यात काम सुरु आहे. – केदार दिघे, ठाणे जिल्हा प्रमुख, शिवसेना ठाकरे गट