ठाणे : भिवंडीतील ठाकरे गटाच्या एका माजी आमदाराने शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यांनी भिवंडी पूर्व मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु त्यानंतर त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. असे असतानाही त्यांची ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली होती. अखेर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. ऐन निवडणूकीत हा पक्ष प्रवेश झाल्याने ठाकरे आणि महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
माजी आमदार रुपेश म्हात्रे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाणे जिल्ह्यातील बहुतांश पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. परंतु रुपेश म्हात्रे हे ठाकरे यांच्यासोबत राहिले होते. त्यामुळे भिवंडीत ठाकरे गटाची मोठी ताकद होती. २०१९ विधानसभा निवडणूकीत या मतदारसंघात शिवसेनेचे रुपेश म्हात्रे आणि समाजवादी पक्षाचे रईस शेख यांच्यामध्ये लढत झाली होती. या निवडणूकीत अवघ्या एक ते दीड हजार मतांनी रुपेश म्हात्रे यांचा पराभव झाला होता.
हेही वाचा >>> Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या कामांना कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात किती मार्क्स? काय म्हणत आहेत ठाणेकर?
महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर समाजवादी पक्ष महाविकास आघाडीत सहभागी झाला. त्यामुळे या निवडणूकीत महाविकास आघाडीने भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा रईस शेख यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे रुपेश म्हात्रे यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच त्यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. ४ नोव्हेंबरला त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. परंतु त्यापूर्वी त्यांनी वांद्रे आणि वरळीत मतदीसाठी आमचा बळी का घेतला जात आहे असे विधान त्यांनी केले होते. . उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतरही त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. वरळी येथून आदित्य ठाकरे तर वांद्रे येथून वरुण सरदेसाई हे निवडणूक लढवित आहेत. त्यामुळे हे वक्तव्य रुपेश म्हात्रे यांना भोवल्याची चर्चा रंगली होती. अखेर शुक्रवारी रात्री म्हात्रे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. ऐन विधानसभा निवडणूकीत रुपेश म्हात्रे यांनी पक्ष प्रवेश केल्याने महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.