Uddhav Thackeray Public Meeting in Thane : शिवसेनेच्या ठाकरे गटाने आज (शनिवार, १० ऑगस्ट) ठाण्यातील गडकरी रंगायतन या सभागृहात मेळावा आयोजित केला आहे. मात्र या मेळाव्यासाठी कार्यक्रमस्थळी दाखल झालेल्या उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेनेच्या शिंदे गटातील कार्यकर्त्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. मनसे व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. तसेच काही कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यातील कारवर शेण व बांगड्या फेकल्या. त्याचबरोबर त्यांच्या ताफ्यातील एका कारची काचही फोडली. दरम्यान, पोलीस व ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांना गडकरी रंगायतन सभागृहात नेलं. त्यापाठोपाठ शिंदे गट व मनसेचे कार्यकर्ते सभागृहात शिरण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे सभागृहाबाहेर तिन्ही पक्षातील कार्यकर्ते भिडल्याचं पाहायला मिळालं. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून हा राडा थांबवला. पोलिसांनी तिन्ही पक्षातील अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.

यावेळी मनसे व शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी ‘उद्धव ठाकरे मुर्दाबाद’ अशाच्या घोषणा दिल्या. तसेच उद्धव ठाकरे यांना पुन्हा कधी ठाण्यात येऊ देणार नाही, असा इशारा देखील दिला. गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना टीव्ही ९ मराठीने विचारलं की तुम्ही तुमच्या पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशांनुसार हे सगळं करत आहात का? त्यावर काही कार्यकर्ते म्हणाले, आम्हाला असा कोणताही आदेश नाही. आमच्या मनाला वाटलं ते आम्ही करत आहोत. बीडमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जे केलं ते आम्ही विसरणार नाही. दुसऱ्या बाजूला शिंदे गटातील कार्यकर्ते देखील उद्धव ठाकरेंविरोधात आक्रमक झालेले पाहायला मिळाले. त्यांनी देखील उद्धव ठाकरेंविरोधात घोषणा दिल्या. यावेळी काही महिला कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंच्या ताफ्यातील वाहनांवर बांगड्या फेकल्या.

Uddhav Thackeray, Ahilyanagar, existence,
अहिल्यानगरमध्ये ठाकरे गटाला गळती, अस्तित्वाचा प्रश्न
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Amol Mitkari Taunts Raj Thackeray
Raj Thackeray : “राज ठाकरेंनी त्यांच्या सुपुत्राचा पराभव का झाला आणि मनसेचा…”, राष्ट्रवादीच्या नेत्याचा टोला
Raj Thackeray Speech News
Raj Thackeray : राज ठाकरेंचं वक्तव्य, “अजित पवार यांचे ४२ आमदार आणि शरद पवारांचे १० आमदार हे कसं शक्य आहे? लोकांनी…”
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
उद्धव ठाकरेंची स्वबळाची भूमिका टोकाची नाही : शरद पवार
uddhav thackeray sharad pawar
उद्धव ठाकरेंचे स्वबळाचे सूतोवाच, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “फार टोकाची…”
Uddhav Thackeray Speech News
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं अमित शाह यांना जोरदार प्रत्युत्तर, “जखमी वाघ काय असतो आणि त्याचा पंजा…”

हे ही वाचा >> Amit Shah : “हर्षवर्धन नेहमी माझी कॉलर पकडून म्हणतो…”, अमित शाहांनी सांगितला किस्सा; म्हणाले, “हा तुमचा वकील…”

राज ठाकरेंच्या ताफ्यावर सुपाऱ्या फेकल्या

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी (९ ऑगस्ट) ते बीड येथील एका कार्यक्रमाला जात होते. बीडमध्ये मनसेचे कार्यकर्ते राज ठाकरे यांचं स्वागत करण्यासाठी थांबले होते. त्याच वेळी मोठ्या जमावाने राज ठाकरे यांचा ताफा अडवला. राज ठाकरे यांच्याविरोधात घोषणाबाजी देखील केली. या जमावातील काही लोक ‘एक मराठा, लाख मराठा’ अशा घोषणा देत होते. हे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनातील कार्यकर्ते असावेत, असं वाटतं होतं. मात्र त्यांच्यापैकी अनेकांकडे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे मशाल हे निवडणूक चिन्ह असलेले झेंडे दिसत होते. त्यामुळे हे ठाकरे गटाचे कार्यकर्ते असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर कार्यक्रमस्थळी ठाकरे गट व मनसे कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला. आंदोलकांनी राज ठाकरे यांच्या ताफ्यातील वाहनांवर सुपाऱ्या फेकल्यामुळे मनसे कार्यकर्ते संतापले होते. याच गोष्टीच्या रागातून आज मनसे कार्यकर्त्यांनी ठाण्यात उद्धव ठाकरेंचा ताफा अडवला.

Story img Loader