कल्याण: शिवसेना फुटीनंतर शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे प्रथमच कल्याण शहराच्या दौऱ्यावर येत्या शनिवारी येणार आहेत. या निमित्ताने त्यांचे जंगी स्वागत करण्याची तयारी कार्यकर्त्यांनी सुरू केली आहे. या भेटीच्यावेळी उध्दव ठाकरे कल्याण लोकसभा मतदारसंघातील उमेदवार आणि त्याविषयीची व्यूहरचना या विषयावर शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत.

शिवसेना फुटीनंंतर उध्दव ठाकरे यांनी कल्याण, डोंंबिवलीत यावे म्हणून दीड वर्षाच्या कालावधीत उबाठा पक्षाचे या भागातील कार्यकर्ते, पदाधिकारी प्रयत्नशील होते. या मागणीला ठाकरे कुटुंबीयांकडून प्रतिसाद दिला जात नव्हता. युवा नेते आदित्य ठाकरे यांनीही पाठ फिरवल्याने कार्यकर्ते नाराज होते. या नाराजीतून गेल्या वर्षी डोंबिवलीत कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख सदानंद थरवळ यांंनी राजीनामा दिला होता. तो ठाकरे यांच्या भेटीनंतर मागे घेण्यात आला.

Sanjay Raut Criticizes Ajit Pawar From Sharad Pawar Mps
Sanjay Raut: ‘फुटणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे’, शरद पवार गटाचे खासदार अजित पवारांची साथ देणार? संजय राऊत संतापले
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Ajit Pawar Sharad Pawar Meet in Delhi
Ajit Pawar Sharad Pawar Meet: अजित पवारांची प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत शरद पवारांशी भेट; कशावर झाली चर्चा? उत्तरादाखल म्हणाले, “मंत्रीमंडळ विस्तार…”
rahul gandhi rajnath singh
Rahul Gandhi: काँग्रेसचं अनोखं आंदोलन, संरक्षण मंत्र्यांसह सत्ताधारी खासदारांना दिलं गुलाबाचं फूल आणि राष्ट्रध्वज!
Shahrukh Khan
“अबराम व आर्यनचा…”, शाहरुख खान दोन्ही मुलांसह एकत्र काम करणार; अनुभव सांगत म्हणाला…
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule : “उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर…”, चंद्रशेखर बावनकुळे यांचं खुलं आव्हान
Raj Thackeray Supports WAQF Amendment bill
“गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी घशात घालून…”, वक्फ दुरुस्ती विधेयकासाठी राज ठाकरे मैदानात; केंद्र व राज्य सरकारकडे मोठी मागणी
ajit pawar rahul narvekar
Video: “जे आहे ते आहे, लाडक्या बहिणीनेच आम्हाला…”, अजित पवारांची विधानसभेत स्पष्टोक्ती!

कल्याण लोकसभा मतदारसंंघात विद्यमान खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्याविषयी नाराजी असल्याची जोरदार चर्चा आहे. याशिवाय त्यांचे मित्रपक्षातील आमदारांशी सख्य नसल्याची चर्चा असल्याने या संधीचा फायदा उठविण्याची तयारी उबाठा पक्षाने सुरू केली आहे. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे अंबरनाथ, बदलापूर, कल्याण, डोंबिवली, २७ गाव असा दौरा करणार असून कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत, असे शिवसेनेतील उबाठा पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा… कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील बेकायदा बांधकामे तोडण्याची जबाबदारी साहाय्यक आयुक्तांवर

उध्दव ठाकरे प्रथमच कल्याण दौऱ्यावर येणार असल्याने त्यांचे जोरदार स्वागत करण्याची तयारी कार्यकर्त्यांनी सुरू केली आहे. शिवसेनेचे उबाठाचे कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख गुरूनाथ खोत, स्थानिक पदाधिकारी विजय साळवी, चंंद्रकांत बोडारे, धनंंजय बोडारे, रमेश जाधव, हर्षवर्धन पालांडे, शरद पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्वागताच्या तयारीचे नियोजन केले जात आहे.

कल्याण लोकसभेसाठी उबाठाकडून तगडा उमेदवार देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला घाम फोडण्याची व्यूहरचना उबाठाकडून आखली जात आहे. कल्याण लोकसभेसाठी सुभाष भोईर, सदानंद थरवळ यांंची नावे आघाडीवर आहेत. या कामासाठी मनसेचे आमदार प्रमोद पाटील यांची ग्रामीण भागातून मदत घेतली जाणार असल्याची चर्चा आहे. डोंबिवलीतही भाजपचे आमदार तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार शिंदे यांच्यात खूप सख्य नसल्याचे समजते. या सर्व संधींचा लाभ उठविण्याची तयारी उबाठाने सुरू केली आहे.

Story img Loader