बदलापूर : उल्हास नदी ही आता इशारा पातळीवर असून बुधवारी दुपारी १२.४० वाजण्याच्या सुमारास उल्हास नदीची पाणी पातळी १६.५० मीटर इतकी झाली होती. त्यामुळे कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या वतीने शहरातील सखल भागांमध्ये सतर्क राहण्याच्या सूचना देण्यास सुरूवात करण्यात आली. बदलापुरात उल्हास नदीची इशारा पातळी १६.५० तर धोका पातळी १७.५० इतकी आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात कोसळणाऱ्या पावसामुळे बदलापूर शहराला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्हा माहिती कार्यालयाकडून ही माहिती ट्वीटद्वारे देण्यात आली आहे.

बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास जिल्हा माहिती कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार उल्हास नदी आपल्या इशारा पातळीपासून अवघ्या काही अंतरावर आहे. उल्हास नदीची धोका पातळी १६.५० इतकी आहे. तर ही पातळी ओलांडल्यानंतर बदलापूर शहरात सखल भागात पाणी साचण्यास सुरूवात होत असते. उल्हास नदीची धोका पातळी १७.५० इतकी आहे. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास जिल्हा माहिती कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार उल्हास नदीने १६.२० मीटर इतकी पातळी गाठली होती. त्यात कर्जत तालुक्यात जोरदार पाऊस पडतो आहे. त्यामुळे असाच पाऊस कायम राहिल्यास बदलापुरातून वाहणाऱ्या उल्हास नदी धोक्याची पातळी गाठण्याची शक्यता व्यक्त होते आहे. त्यामुळे कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाने शहरातील उल्हास नदीलगत असलेल्या तसेच उल्हास नादिलगत असलेल्या दुबे बाग, वृद्धाश्रम, ऐयरसन शाळा, रितू वर्ल्ड येथील १८ बंगले व इतर सखल भागातील नागरिकांना अग्निशमन दलामार्फत सतर्क करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. कासगाव,चांमटोली परिसरात पाणी भरायला सुरुवात झाली असून तेथे पाणी रस्त्यावर येऊन कर्जत राज्यमार्ग बंद पडू शकतो, अशीही माहिती जिल्हा माहिती कार्यालयामार्फत देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तर पूरस्थिती

उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने बदलापूर शहराला पुराचा फटका बसतो. त्यामुळे बदलापूर शहरातील उल्हास नदीच्या पाणी पातळीवर पावसाळ्यात लक्ष ठेवले जाते. ठाणे जिल्ह्यात पाऊस नसला तरी रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात आणि आसपासच्या परिसरात पाऊस पडला तरी उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असते. सध्या बदलापूर आणि आसपासच्या परिसरात रिमझीम पाऊस असला तरी कर्जत तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पुन्हा पूरस्थिती उद्भवण्याची भीती व्यक्त होते आहे.

Story img Loader