लोकसत्ता प्रतिनिधी

बदलापूर: तब्बल २४ तासानंतर बदलापूर मधून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पाणी पातळीत घट नोंदवली गेली आहे. गुरुवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास बदलापूर वाहणाऱ्या उल्हास नदीची पाणी पातळी १५.९० मीटर इतकी होती. १६.५० मीटर इशारा पातळीच्या खाली सध्या उल्हास नदी वाहते आहे. त्यामुळे बदलापूरकरांचा जीव भांड्यात पडला आहे.

Two young man drowned while fishing at Sadve in Dapoli
दापोलीतील सडवे येथे मासे पकडायला गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
snails in freshwater pune
पुणे शहरातील गोड्या पाण्यातील गोगलगायींचे प्रमाण का घटतेय? स्थानिक जैवविविधतेसाठी धोक्यीची घंटा?
Rupee lowers as foreign investment returns to capital markets
रुपयाचा सार्वकालिक नीचांक; एक डॉलर आता ८४.११ रुपयांना
Bangladesh Power Supply Alert
Bangladesh Power Supply Alert : अदानी पॉवरचा बांगलादेशला वीज खंडित करण्याचा इशारा; मोहम्मद युनूस सरकार थकीत वीज बिल भरणार?
Diwali 2024 reuse flowers and diya trending jugad video goes viral
VIDEO: दिवाळीनंतर सुकलेली फुलं आणि गूळ पाण्यात नक्की टाकून पाहा; परिणाम पाहून तुम्हीही अवाक् व्हाल
Constant changes in the states climate But wait for the winter
राज्यात थंडीची प्रतिक्षाच! पाऊस मात्र…
Maharashtra winter updates
Winter News: नोव्हेंबरमध्ये अपेक्षित थंडी नाहीच; मध्य, दक्षिण भारतात जोरदार पावसाचा अंदाज

गेल्या दोन दिवसात ठाणे आणि रायगड जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली होती. मंगळवारी सायंकाळपासून सुरू झालेला पाऊस बुधवारी दुपारपर्यंत संततधर होता. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाची नदी असलेल्या उल्हास नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ नोंदवली गेली. बुधवारी सकाळी उल्हास नदीने १६.५० मीटरची इशारा पातळी ओलांडली होती. त्यानंतर दुपारी ३ नंतर उल्हास नदी १७.५० मीटरच्या आपल्या धोका पातळीवरून वाहत होती. त्यामुळे बदलापूर आणि कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागात सखल भागात पाणी शिरू लागले होते. सायंकाळी सहा नंतर उल्हास नदीच्या पाणी पातळीत घट नोंदवली गेली.

आणखी वाचा-कल्याण-अहमदनगर रस्ता वाहतुकीसाठी खुला, रायते नदी पुलावरील पाणी ओसरले

सकाळी ११ वाजेपर्यंत उल्हास नदी इशारा पातळीच्या जवळ अर्थात १६.२० मीटर पातळीवरून वाहत होती. मात्र त्यानंतर रायगड जिल्ह्यात कमी झालेला पाऊस आणि बदलापुरातही पावसाने घेतलेल्या थोड्या विश्रांतीमुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत घट नोंदवली गेली. गुरुवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास उल्हास नदीची बदलापूर येथील पाणी पातळी १५.९० मीटर इतकी होती. त्यामुळे बदलापुरातील पुराचा धोका काही अंशी टळला. पाणी पातळी कमी झाल्याने बदलापूर येथील नागरिकांचा जीव भांड्यात पडला.