उल्हासनगर शहरात एका लग्नाच्या वरातीत नवरदेवाच्या वाहनाचा ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात ११ वऱ्हाडी मंडळी लग्न मांडवाऐवजी थेट रुग्णालयात पोहोचले आहेत. यात एकाची प्रकृती चिंताजनक असून या वऱ्हाड्याला मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उल्हासनगर शहरातील विठ्ठलवाडी स्थानक शेजारी असलेल्या प्रवीण इंटरनॅशनल या हॉटेलमध्ये रोहित धरमपाल रिझवानी यांचा विवाह सोहळा आयोजीत करण्यात आला होता.

हेही वाचा >>> डोंबिवलीतील पिंपळेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचे प्रकाश म्हात्रे यांचा अध्यक्ष पदाचा राजीनामा

minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
Controversial statement of MP Dhananjay Mahadik on Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेवरून खासदार धनंजय महाडिक यांचे वादग्रस्त विधान; खासदार प्रणिती शिंदे, आमदार सतेज पाटील यांचे टीकास्त्र
passenger dies after st bus crash in swargate depot premises
स्वारगेट स्थानकाच्या आवारात एसटी बसच्या धडकेत प्रवासी तरुणाचा मृत्यू
Accused who surrendered in Kalyaninagar accident case remanded in police custody Pune
कल्याणीनगर अपघात प्रकरणात शरण आलेल्या आरोपीला पोलीस कोठडी
Balu Dhanorkar mother, Vatsala Dhanorkar claim,
खळबळजनक! खासदार बाळू धानोरकरांचा घातपात, आईच्या दाव्याने शंका कुशंका
construction worker dies after gets trapped in jcb machine
जेसीबी यंत्राखाली सापडून बांधकाम मजुराचा मृत्यू

सोमवारी सायंकाळच्या सुमारास लग्नाचे वऱ्हाडी वाजत गाजत प्रवीण हॉटेलच्या आवारात पोहोचत होते. अचानक नवरदेवाचे वाहन चालवणारे विशाल लुधवानी यांचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी थेट वऱ्हाडी मंडळींच्या अंगावर गेली. त्यामुळे वरातीत नाचणाऱ्या तब्बल ११ जणांना गाडीची जोरदार धडक बसली. या घटनेतील जखमीना तात्काळ उल्हासनगरच्या मीरा या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ते एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला मुंबईला हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही किरकोळ जखमीना उपचार करून सोडून देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी गाडी जप्त केली असून विशाल लुधवानी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.