उल्हासनगर : लोकसभा निवडणुकीत उल्हासनगरातून शिवसेनेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांना वैयक्तिक पाठिंबा देत मैत्रीची युती असे जाहीरपणे सांगणाऱ्या आणि भाजपला विरोध करणाऱ्या टीम ओमी कलानीने आपल्या गोव्याच्या कार्यकारिणी बैठकीत ओमी कलानी यांना विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून घोषित केले आहे. ओमी कलानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाकडून कलानी विधानसभेच्या रिंगणात असतील. पप्पू कलानी, ज्योती कलानी यांच्यानंतर निवडणुकीत उतरणारे ओमी कलानी तिसरे कलानी ठरणार आहेत. गोव्यातल्या बैठकीत १८ सदस्यीय समितीचीही घोषणा करण्यात आली असून त्यात स्वतः पप्पू कलानी, माजी महापौर पंचम कलानी यांच्यासह कलानी यांचे जुने साथीदार, विविध संघटनांचे प्रमुख यात आहेत.

उल्हासनगर विधानसभा मतदारसंघ एकेकाळी कलानी कुटुंबियांचा वरचष्मा असलेला मतदारसंघ म्हणून ओळखला जात होता. कुमार आयलानी यांनी भाजपच्या माध्यमातून त्याला छेद देत आमदारकी मिळवली. मात्र २०१४ च्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कुमार आयलानी यांचा अवघ्या २००४ मतांनी निसटता विजय झाला. त्यांनी ज्योती कलानी यांचा पराभव केला. या निवडणुकीपूर्वी महापालिका निवडणुकीत एकत्र लढणाऱ्या टीम ओमी कलानी आणि भाजपने फारकत घेतली.

Ministers from various states campaigned in Mira Bhayandar on Sunday
मिरा-भाईंदर शहरात रविवारी विविध राज्यातील मंत्री प्रचारात
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Congress Priyanka Gandhi held road show in two constituencies in Nagpur on Sunday
प्रियंका गांधींचा आज नागपुरात या दोन ठिकाणी ‘रोड-शो’
bjp slogans batenge to katenge ek hai to safe hai in maharashtra assembly elections
अग्रलेख : घोषणांच्या म्हशी…
Mumbai traffic routes marathi news
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी वाहतुकीत बदल
students Islamic organization sio
‘एसआयओ’तर्फे विद्यार्थ्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध; विविध शैक्षणिक, सामाजिक, रोजगार, पर्यावरण संवर्धनाशी संबंधित मागण्यांवर भर
narendra modi yogi adityanath campaign in maharashtra
लालकिल्ला : मोदी-योगींच्या प्रचाराने काय साधणार?
Political parties, election campaign. giant hoarding, Mumbai
फलकबाजी… टोलेबाजी; मुंबईत महाकाय फलकांद्वारे राजकीय पक्षांची श्रेयवादासाठी चढाओढ

हेही वाचा…डोंबिवलीत घराच्या छतावर चढलेल्या विद्यार्थ्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू

कलानी गटाने भाजपला महापालिकेच्या सत्तेपासूनही दूर सारले. त्यामुळे कलानी आणि भाजपता वितुष्ट निर्माण झाले होते. गेल्या काही महिन्यांपासून शहरावर एकहाती वर्चस्व असलेले आणि मधल्या काळात तुरूंगातून मुक्त झालेले सुरेश उर्फ पप्पू कलानी शहरात सक्रीय आहेत. त्यामुळे टीम कलानीने पुन्हा शहरात वेगाने बांधणी सुरू केली होती. लोकसभा निवडणुकीत टिम ओमी कलानी यांनी शिवसेनेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा दिला. त्यांचा प्रचारही केला. मात्र कलानी महायुतीत सहभागी नव्हते. त्यांनी प्रचारादरम्यान भाजप नेत्यांचे छायाचित्र वापरणेही टाळले होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत कलानी गट रिंगणात उतरणार हे स्पष्ट झाले होते.

नुकतेच गोवा येथे टीम ओमी कलानीची कार्यकारिणी बैठक पार पडली. या बैठकीत १८ सदस्यीय कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. या कार्यकारिणीत माजी आमदार सुरेश उर्फ पप्पू कलानीही असणार आहे. तर काँग्रेसचे एकेकाळचे ज्येष्ठ नेते जयराम लुल्ला यांच्याकडे कार्यकारिणीचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. याचवेळी ओमी कलानी यांची उल्हासनगर विधानसभेचे उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली. ओमी कलानी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या शरद पवार गटातर्फे निवडणुकीत लढवतील असे टीम ओमी कलानीचे प्रवक्ते कमलेश निकम यांनी सांगितले आहे. या कार्यकारिणीत उत्तर भारतीय, व्यापारी संघटना, मागासवर्गीय समिती अशा विविध व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे.

हेही वाचा…कल्याणमधील बैलबाजारातील कंपनीत तरूणीचा कामगारांकडून विनयभंग

गट उल्हासनगरचा, बैठक गोव्यात

टीम ओमी कलानीच्या गोव्यातील कार्यकारिणी बैठकीची सध्या शहरात जोरदार चर्चा रंगली आहे. टीम ओमी कलानी गट उल्हासनगर शहर आणि आसपासच्या शहरांपुरता मर्यादीत आहे. त्यानंतरही या गटाची गोव्यात बैठक संपन्न झाली. त्यावरून मोठी चर्चा रंगली आहे.