उल्हासनगरः उल्हासनगर मतदारसंघाचे आमदार कुमार आयलानी यांचे पुत्र धीरज आयलानी यांची त्यांच्याच भागिदारांनी तब्बल १ कोटी ६० लाख रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बांधकाम व्यवसायात पैशांचा अपहार केल्याचा आरोप आयलानी यांनी त्यांच्या तक्रारीत केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उल्हासनगर विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार कुमार आयलानी यांचे पुत्र धीरज आयलानी बांधकाम आणि ह़ॉटेल व्यवसायात सक्रीय आहेत. मे मोनार्च एलएलपी कंपनीत ते भागिदार असून त्यात त्यांची ३३ टक्के भागिदारी असल्याची माहिती आहे. या भागिदारीतून त्यांनी त्यांचे भागिदार हसमुख ठाकूर आणि गोपाल ठाकूर यांच्यासोबत इमारतींचे बांधकाम केले. या बांधकाम केलेल्या इमारतीमधईल काही सदनिका धीरज आयलानी यांच्या समंतीशिवाय परस्पर विक्री करण्यात आली. ग्राहकांकडून रक्कम घेऊन ती इतर कंपन्यांमध्ये आणि खासगी खात्यात टाकल्याची तक्रार धीरज आयलानी यांनी केली होती. रोख आणि व्यवहार स्वरूपात सुमारे १ कोटी ६० लाख रूपयांचा अपहार झाल्याचा आरोप आयलानी यांनी आपल्या तक्रारीत केला होता. त्यानुसार मध्यवर्ती पोलीस ठाण्यात हसमुख ठाकूर आणि गोपाल ठाकूर यांच्याविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ulhasnagar mla kumar ailani son defrauded of rs 1 crore 60 lakh ysh
Show comments