उल्हासनगरः एकीकडे उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील विविध विकासकामांना पालिकेच्या घटलेल्या उत्पन्नांचा फटका बसतो आहे. तर दुसरीकडे ज्या प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध केला आहे त्या कामांमध्ये दिरंगाई होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. उल्हासनगरच्या कॅम्प पाच भागात असेलल्या प्रभाग उद्यानाच्या कामासाठी १ कोटींचा निधी मंजूर आहे. मात्र तरीही काम अपूर्ण असलेल्या उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्तांनी कंत्राटदार आणि एका अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उल्हासनगर शहरातील विविध विभागांमध्ये सुरू असलेला भोंगळ कारभार नव्या आयुक्त मनिषा आव्हाने यांच्याकडून उघड केला जातो आहे. काही दिवसांपूर्वी क्रीडा संकुलाच्या पाहणी दरम्यान त्यांना अनेक त्रुटी दिसल्या. तर काही दिवसांपूर्वी पालिका शाळांमध्ये पाहणी दरम्यान विद्यार्थ्यांना योग्यरित्या वाचता येत नसल्याचे दिसून आले.

शाळेच्या परिसरात अतिक्रमण केले जात असल्याचेही दिसून आले होते. त्यानंतर त्यांनी संबंधित शिक्षकाला नोटीस दिली. तर त्याचवेळी शाळा परिसरातील अनधिकृत बांधकामे हटवण्याचे आदेश दिले. शनिवारी त्यांनी अशाच एका उद्यानाच्या कामाची पाहणी केली. त्यावेळी त्यातही कंत्राटदार आणि संबंधित अधिकारी हातात हात घालून पालिकेच्या डोळ्यात धुळफेक करत असल्याची बाब समोर आली.

उल्हासनगर शहरात महापालिकेच्या वतीने काही उद्याने, क्रीडा संकुल विकसीत केले जात आहेत. महापालिकेने कॅम्प पाच येथील प्रभात उद्यानाच्या सौंदर्यीकरणासाठी १ कोटी रुपयांचा निधी दोन वर्षांपूर्वी मंजूर झाला होता. त्यानंतर सर्व प्रक्रिया पूर्ण होत २०२३ वर्षात संबंधित कंत्राटदाला कार्यादेश देण्यात आले. मात्र एक वर्ष उलटूनही या उद्यानाचे काम पूर्ण झाले नाही. उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी नुकतीच या उद्यानाच्या कामाची पाहणी केली.

यावेळी त्यांना या कामात अनेक त्रुटीही दिसल्या. तर कामही अपूर्ण असून अनेक ठिकाणी कंत्राटदाराकडून हलगर्जीपणाही केल्याचे दिसून आले. त्यामुळे तातडीने कंत्राटदार आणि संबंधित अधिकाऱ्याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी सहा अधिकाऱ्यांची विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत नगररचनाकार, अभियंता, उद्यान अधीक्षक, लेखाधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम अभियंता यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या चौकशी समितीतून नेमके काय बाहेर येईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या चौकशीनंतर इतर विभागातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.