देशातील एक व्यापारी शहर तसेच विस्थापितांचे शहर म्हणजे उल्हासनगर. व्यापारानंतर येथील वादग्रस्त राजकीय इतिहासामुळे उल्हासनगरची ख्याती देशभर पसरली आहे. यंदा हे शहर पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जात आहे. कोंडीत सापडलेल्या या शहराचा विकास येथील राजकारण्यांच्या अजेंडय़ावर नाही. त्याऐवजी सध्या गुन्हेगारीचे उदात्तीकरण शहरात सुरू असलेले दिसते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मूलत: उल्हासनगरमधून आलेल्या सिंधी निर्वासितांचे शहर अशी उल्हासनगरची ओळख असली तरी सध्या हे एक बहुभाषिक शहर आहे. शहरातील राजकारणाच्या चाव्या गेली काही वर्षे मराठी सत्ताधाऱ्यांच्या हाती आहेत. त्याआधीची चार दशके येथील राजकारण कलानी कुटुंबीयांभोवती फिरत होते. गंमत म्हणजे मध्यंतरीच्या काळात उल्हासनगरला कलानी कुटुंबीयांच्या पाशातून मुक्त करण्यासाठी ज्यांनी जंग जंग पछाडले, तीच मंडळी आता शतप्रतिशत सत्तेसाठी कलानी परिवारासोबत आहेत.
शहराच्या भवितव्यावर त्याचे दूरगामी परिणाम होणार आहेत. उल्हासनगर शहरातल्या राजकारण्यांचा आणि मतदारांचा इतिहास जरा वेगळा आहे. त्याला एक प्रकारे परंपराही म्हणता येईल. उल्हासनगर शहरात निवडणुकांपूर्वी महापौर पदावर विराजमान असलेली व्यक्ती सहसा निवडणुकीच्या रिंगणात टिकत नाही. त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकांच्या निवडणुकीत ज्या पक्षाला लोकमान्यता मिळते, तो पक्ष त्यापुढच्या निवडणुकांत टिकत नाही. विरोधी पक्षाला सत्ता मिळते, असाही इतिहास आहे. त्यामुळे हा इतिहास बदलण्यासाठी सध्या केंद्रात आणि राज्यात सत्ता असलेल्या भाजपने प्रयत्न सुरू केले आहे. माजी आमदार कुमार आयलानी आणि पप्पू कलानी यांच्याच विस्तवही जात नव्हता. सध्या एका हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कुख्यात गुंड पप्पू कलानी कुमार आयलानी यांचा कट्टर विरोधक होता.
कुमार आयलानी यांनी पप्पू कलानीविरुद्ध दोन तर त्यांची पत्नी ज्योती कलानी यांच्याविरुद्ध एक वेळा निवडणूक लढवली. याचाच अर्थ कलानी साम्राज्याला धक्का पोहोचवण्यासाठी कुमार आयलानी यांनी दीड दशक झुंज दिली. त्यातील २००९ मध्ये त्यांची लढाई यशस्वी ठरली आणि पप्पू कलानी यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र २०१४ च्या निवडणुकीत पुन्हा कलानी कुटुंबातील ज्योती कलानी यांनी विजय मिळवत कुमार आयलानी यांचा पराभव केला. मात्र त्यापूर्वी १९९० पासून पप्पू कलानी या व्यक्तीविरुद्ध भाजपच्या विविध नेत्यांनी लढा दिला. विधानसभा निवडणुकीत १८८५ नंतर प्रथमच २००९ मध्ये पप्पू साम्राज्याला धक्का पोहोचवण्यात आयलानी यांनी यश मिळवले होते. मात्र गेली २७ वर्षे ज्या भाजपने कलानी कुटुंबाविरुद्ध राजकीय लढाई लढली, त्याच भाजपच्या नव्या नेत्यांना जुन्यांचा विसर पडला आहे. त्यामुळे त्यांनी पुन्हा भाजपची सत्ता मिळवण्यासाठी उल्हासनगरात प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र यंदा विरोधकांना, ज्यात गुंड, गुन्हेगार आणि शिक्षा भोगणाऱ्यांचा समावेश आहे. अशांनाच आपल्या सोबत घेऊन सत्तेचा किल्ला सर करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
ज्यांच्याविरुद्ध काही वर्षांपूर्वी भाजपने गुन्हे दाखल केले होते, त्याच गुन्हेगारांना आपल्या पक्षात घेण्यासाठी तेच गुन्हे स्वत:हून मागे घेतले गेले आहेत. तसेच काही वर्षांपूर्वी पप्पू कलानी आणि गोपू बहरानी यांनी जे राजकारण केले तेच राजकारण सध्या ओमी कलानी आणि कुमार आयलानी करत असल्याचा प्रचारही शहरात करण्यात येतो आहे. दुर्दैव इतकेच की, खुनासारख्या गंभीर गुन्ह्य़ांखाली जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कलानी कुटुंबाचा म्होरक्या पप्पू कलानी याच्या नावे आता शहरात विकासाच्या नावाखाली प्रचार सुरू आहे. त्याच्या विजयाचे गुनगान गायले जात असून त्याच्या कामाचे दाखले दिले जात आहेत. त्यामुळे शहरातील राजकारण नक्की कोणत्या दिशेकडे चालले आहे, हा प्रश्न पडतो आहे. तसेच निष्ठावान कुमार आयलानी आणि त्यांच्यासारख्या इतर नेत्यांना वरिष्ठांमुळे तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागतो आहे. त्यामुळे सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, अशीच परिस्थिती शहरातील जुन्या भाजप कार्यकर्त्यांची झाली आहे.
सत्तेच्या चाव्या मिळवण्याचे राजकारण सध्या अशा टोकाला गेले आहे, की जिथे पक्षनिष्ठा, नीतिमत्ता, विश्वासार्हता या गोष्टी रद्दबातल ठरत आहेत. सर्व विरोधकांना एकच पर्याय या विचित्र युतीने समोर ठेवला आहे. एक तर तुम्ही गटात सामील व्हा अथवा खोटय़ा गुन्ह्यांसाठी तयार राहा. त्यामुळे विरोधी गोटातही प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. एक मात्र नक्की, पार्टी विथ द डिफरन्स म्हणविणाऱ्या पक्षाचा खरा चेहरा यानिमित्ताने पुन्हा एकदा समोर आला आहे..