शिवसेना-भाजपचे ‘तुझे माझे जमेना, तुझ्याविना चालेना’

केंद्र आणि राज्यात नरेंद्र मोदी यांची लाट असतानाही उल्हासनगर विधानसभेत भाजपला धूळ चारणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार ज्योती कलानी आणि कलानी कुटुंबीयांसाठी यंदाची महापालिका निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार असून कलानी यांच्याशी दोन हात करायला निघालेल्या भाजपला परंपरागत मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेकडून असहकार सहन करावा लागत असल्याचे चित्र यंदा दिसत आहे. कलानी यांना आव्हान उभे करायचे असेल तर युतीशिवाय पर्याय नाही, हे दोन्ही पक्षांचे नेते खासगीत मान्य करताना दिसतात. मात्र, जागावाटपाच्या चर्चेत एक पाऊल मागे कुणी जायचे यावरून येथे युतीचे घोडे अडले असून निवडणुकांची तारीख जाहीर झाल्याने येथील राजकीय घडामोडींना बुधवारपासून कमालीचा वेग आल्याचे चित्र दिसू लागले आहे.

Controversy over MLA Suresh Khades statement about Miraj constituency as mini Pakistan
मिरजेच्या उल्लेखावरून वातावरण तापले
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Shiv Sena UBT to contest local elections independently
महापालिका निवडणुकांआधी मविआत फूट? ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत स्वबळावर लढणे कितपत शक्य?
Akola Municipal Corporation Election news in marathi
अकोला महापालिकेतील ‘प्रशासक राज’ केव्हा संपणार?; संभाव्य निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी, वर्चस्व राखण्याचे भाजपपुढे आव्हान
Sanjay Raut On Municipal Corporation election
Sanjay Raut : मुंबई महापालिकेची निवडणूक ठाकरे गट स्वबळावर लढणार? संजय राऊतांचं मोठं भाष्य; म्हणाले, “दिल्लीत जे घडलं तेच…”
some bad decisions happened on eknath shinde tenure as chief minister says forest minister ganesh naik
एकनाथ शिंदे यांच्या कालखंडात काही चुकीच्या गोष्टी घडल्या; वनमंत्री गणेश नाईक यांचे विधान
Image of ECI Chief Rajiv Kumar
EVM Manipulation : “झूठ के गुब्बारों को बुलंदी मिलें…” ईव्हीएमवरील आरोपांना ‘ECI’चे शायरीतून उत्तर; महाराष्ट्राचा दाखला देत फेटाळले आरोप
supreme court slam Punjab government
चुकीची प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न, डल्लेवाल यांच्या आंदोलनावरून सर्वोच्च न्यायालयाचे पंजाब सरकारवर ताशेरे

सिंधीभाषिकबहुल असलेल्या उल्हासनगर महापालिकेची स्थिती मतांच्या बाबतीत संमिश्र राहिली आहे. उल्हासनगर महापालिका क्षेत्रात तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. कल्याण पूर्वचे भाजप समर्थक आमदार गणपत गायकवाड, अंबरनाथ शिवसेनेचे आमदार बालाजी किणीकर या दोघांच्या मतदारसंघातील काही भागही उल्हासनगर महपालिका क्षेत्रात मोडतो. त्यामुळे कलानी यांना टक्कर द्यायची असेल तर त्यांच्या कुटुंबीयांपैकी कुणाला तरी पक्षात प्रवेश द्या अशी भूमिका शहराबाहेरील भाजपचे नेते मांडताना दिसतात. स्थानिक भाजप नेत्यांचा मात्र त्यास विरोध आहे. त्यामुळेच पप्पू यांचा मुलगा ओमी यांच्या भाजप प्रवेशाचे त्रांगडे निर्माण झाले आहे.

उल्हासनगर महापालिकेत शिवसेना, भाजप, रिपाइंची युती सत्तेत आहे. पाच वर्षांपूर्वी पप्पू कलानी यांचा पराभव केल्यानंतर युतीने महापालिकेतही कलानी यांचे वर्चस्व मोडून काढले. अडीच वर्षांनंतर हे चित्र पुन्हा बदलले आणि मोदी लाटेतही राष्ट्रवादीच्या ज्योती कलानी निवडून आल्या. उल्हासनगरात शिवसेना-भाजप स्वतंत्र्यपणे लढल्याचा फटका युतीला बसला आणि कलानी विजयी झाल्या. या निकालाची पुनरावृत्ती यंदाच्या महापालिका निवडणुकीतही होईल का याची भीती युतीच्या नेत्यांना आहे. त्यामुळे कलानींच्या पराभवासाठी युती तर करायची आहे, पण जागा वाटपात मागेही हटायचे नाही अशा दुहेरी कात्रीत युतीचे नेते सापडले आहेत.

राष्ट्रवादीच्या आशा कायम

सद्यस्थितीत उल्हासनगर महापालिकेत शिवसेनेचे १९, भाजप ११, रिपाइं ४ आणि ४ अपक्ष नगरसेवक अशी युती आहे, तर राष्ट्रवादी कॉँग्रेस २०, कॉँग्रेस ८, साई पक्षाचे ७, बहुजन समाजवादी पक्षाचे ४, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १ नगरसेवकांचा दुसरा गट आहे. असे असले तरी विधानसभा निवडणुकीतील विजयामुळे कलानी कुटुंबीयांचे मनोबल वाढले आहे. विधानसभा निवडणुकीत सिंधी बहुल मतदार कलानी यांच्यामागे उभे राहिल्याचे दिसून आले. त्यामुळे ओमी यांना भाजप प्रवेश द्यायचा आणि शिवसेनेची जिरवायची अशी रणनीती भाजपच्या धुरिणींनी आखली आहे. मात्र, त्यास स्थानिक भाजप नेत्यांना कडवा विरोध आहे. त्यामुळे युतीची चर्चा अंतिम टप्प्यात येण्यापूर्वीच भाजपच्या स्थानिक कार्यकारिणीने रिपाइंला १२ जागा जाहीर केल्या होत्या. यामुळे शिवसेनेतही अस्वस्थता आहे.

सिंधी मते निर्णायक

सद्यस्थितीत उल्हासनगर पूर्व आणि पश्चिमेत सिंधी भाषिकांचे प्राबल्य अधिक आहे. पूर्वेत ४० जागा असून येथे सिंधी भाषिकांचे प्राबल्य आहे. येथील मतांच्या जोरावरच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकीत मते मिळवली होती. याच मतांवर भाजपचा डोळा असून त्यासाठी ओमी कलानींच्या प्रवेशासाठी थेट वरिष्ठ पातळीवरूनही संकेत देण्यात येत आहेत. त्याचवेळी पश्चिम भागात शिवसेनेचे प्राबल्य आहे. येथे एकूण ३८ जागा असून येथे मराठी भाषिकांची संख्या मोठी आहे. तीन विधानसभा मतदारसंघामध्ये विभागलेला भाग संमिश्र लोकवस्तीचा असला तरी तेथे शिवसेनेचे प्राबल्य आहे.  शिवसेना भाजप वेगवेगळे लढल्यास येथे मतांचे विभाजन होऊ न शिवसेनेला फटका बसण्याची शक्यता आहे.

Story img Loader