दुकान नोंदणीचे प्रमाणपत्र देण्यासाठी पंधराशे रुपयांची लाच स्वीकारताना उल्हासनगर महापालिकेतील दोन कर्मचाऱ्यांना व एका खासगी दलालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी अटक केली. एक महापालिका कर्मचारी सेवानिवृत्त झाला आहे. एका व्यक्तीला उल्हासनगर महापालिकेतून दुकान नोंदणीचे प्रमाणपत्र घ्यायचे होते. या प्रमाणपत्रासाठी सदाशिव संख्ये या निवृत्त कर्मचाऱ्याने पंधराशे रुपयांची मागणी दुकान निरीक्षक प्रवीण पितळे यांच्या वतीने तक्रारदाराकडे केली. तक्रारदाराने पितळे यांना रक्कम देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी हेमा बच्छानी या दलालाकडे रक्कम देण्यास सांगितले. ही रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तिघांना अटक केली.

Story img Loader