उल्हासनगरः मंगळवारी गोरेगाव रेल्वे स्थानकातून अपहरण झालेल्या ५ वर्षीय बालकाची उल्हासनगर पोलिसांनी शहाड रेल्वे स्थानकातून सुटका करत दोन आरोपींना अटक केली आहे. बुधवारी बोरिवली रेल्वे पोलीसांनी उल्हासनगर पोलिसांना याबाबत माहिती कळवताच उल्हासनगर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली.

बोरीवली रेल्वे पोलीस ठाण्यात नोंद एका गुन्ह्यनुसार एका ५ वर्षीय बालकाचे गोरेगाव रेल्वे स्थानकातून मंगळवार ११ फेब्रुवारी रोजी अपहरण झाले होते. या प्रकरणातील गुन्ह्याच्या तपासात संबंधित अपहरण झालेले बालक शहाड रेल्वे स्थानकाजावळ असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्यांनी उल्हासनगर पोलिसांना याबाबत माहिती आणि फोटो पाठवला होता. त्यानुसार पोलिसांनी तातडीने बालकाचा शोध सुरू केला. पोलिसांनी अपहृत बालक आणि आरोपीचा महात्मा फुले चौक ते शहाड रेल्वे स्थानक परिसरात शोध घेतला. यावेळी बालक हा करण रामथिरण कनोजीया रा. गोरेगाव मुंबई आणि धरमपाल रामकिषोर यादव रा.सध्या खोपोली रायगड, मुळ उत्तरप्रदेश यांच्या सोबत आढळला. पोलिसांनी या दोघांना शिताफीने ताब्यात घेतले.  पोलिसांनी बालकाला बोरिवली पोलीस ठाण्याच्या पोलिसांकडे सुपूर्द केले. यावेळी आरोपींनाही पोलिसांकडे सोपवण्यात आले.

Story img Loader