उल्हासनगर महापालिका प्रभाग समिती क्रमांक चारमध्ये मोडकळीस आलेल्या घराच्या बांधकामावर कारवाई न करण्यासाठी तसेच नव्याने उभारत असलेल्या घराच्या बांधकाम परवानगी देण्यासाठी सहायक आयुक्तांसाठी लाचेची मागणी करणाऱ्या आणि ती स्विकारणाऱ्या उल्हासनगर महापालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. ३० हजारांची लाचेची मागणी करत २५ हजार स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली. यात प्रभारी मुकादम रतन जाधव आणि सफाई कामगार विजय तेजी यांना रंगेहाथ पकडण्यात आले असून सहायक आयुक्त महेंद्र पंजाबी यांचा शोध घेतला जातो आहे.

हेही वाचा >>> व्याजाचा व्यवसाय वाढीसाठी उल्हासनगरमध्ये पुजाऱ्याच्या घरी दरोडा टाकणारी टोळी अटकेत

Image Of Devendra Fadnavis.
Devendra Fadnavis : राज्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीचे सर्वाधिकार देवेंद्र फडणवीस यांना; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी मंत्रिमंडळाचा निर्णय
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Neelam Gorhe issued important warning to police and other departments regarding case of women abused by psychiatrists in Nagpur
नागपुरात मानसोपचार तज्ज्ञांकडून महिलांवर अत्याचार प्रकरण…आता थेट उपसभापतींनीच…
cm devendra fadnavis prohibiting appointments of private secretaries in government offices
खासगी व्यक्तींच्या नियुक्तीस मनाई; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाने मंत्र्यांना धक्का
maharashtra election commissioner news in marathi
राज्य निवडणूक आयुक्तपदाचा आज निर्णय; नितीन करीर, राजीव जलोटा, राजगोपाल देवरा स्पर्धेत
Hindu Bahujan mahasangh
नागपूर : अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाचा विषय तापला, हिंदू बहुजन महासंघाचा इशारा
UGC, recruit professors, Instructions UGC,
आयोगामार्फत प्राध्यापक भरतीस नकार; प्रचलित नियमांनुसारच प्रक्रिया राबवण्याच्या ‘यूजीसी’च्या सूचना
Forest Minister Ganesh Naik was upset with officials response and warn to forest officials
अधिकाऱ्यांच्या उत्तराने वनमंत्री नाराज, वनाधिकाऱ्यांना दिली तंबी…

भ्रष्टाचाराने बरबटलेल्या उल्हासनगर महापालिकेतील आणखी दोन लाचखोर कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाच स्वीकारताना मंगळवारी रंगेहात अटक केली आहे. विशेष म्हणजे यंदाही सहाय्यक आयुक्तांसाठी लाच स्वीकारण्यात आली होती. यापूर्वीही अनेक घटनांमध्ये सहाय्यक आयुक्त लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. मंगळवारी पुन्हा एकदा सहाय्यक आयुक्तांसाठी लाच मागणाऱ्या दोन पालिका कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली. तक्रारदाराच्या मोडकळीस आलेल्या घराच्या उभारणीसाठी बांधकाम परवानगी मिळावी आणि मोडकळीस आलेल्या घरावर कोणतीही कारवाई केली जाऊ नये यासाठी ३० हजार रुपयांची लाचेची मागणी करण्यात आली होती. प्रभाग समिती क्रमांक चारचे सहाय्यक आयुक्त महेंद्र पंजाबी यांच्यासाठी प्रभारी मुकादम रतन जाधव आणि सफाई कामगार विजय तेजी या दोघांनी 25 हजारांची लाच स्वीकारली. यावेळी दोघांना रंगेहात पकडले. या दोन्ही पालिका कर्मचाऱ्यांनी सहाय्यक आयुक्त महेंद्र पंजाबी यांच्यासाठी लाच स्वीकारल्याचे मान्य केले आहे. त्यामुळे सहाय्यक आयुक्त प्रभाग चार महेंद्र पंजाबी यांचा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून शोध घेतला जातो आहे. या सापळ्यानंतर उल्हासनगर महापालिकेतील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. विशेष म्हणजे प्रभारी असलेल्या कार्यकारी पदावरच्या अधिकाऱ्यांकडून लाचखोरी केली जात असल्याने पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

Story img Loader