वागळे इस्टेटमधील ३५० बांधकामे जमीनदोस्त; सावरकर नगर, लोकमान्यनगरातील कोंडी घटणार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ठाणे शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर उतारा म्हणून महापालिकेने गतवर्षी राबवलेल्या रस्ता रुंदीकरण मोहिमेला नवववर्षांत पुन्हा धडाक्यात सुरुवात करण्यात आली आहे. रुंदीकरणाआड येणारी बांधकामे हटवण्याची कारवाई करण्यात येत असून सोमवारी वागळे इस्टेट परिसरातील कामगार रुग्णालय नाक्यापासून ज्ञानेश्वरनगपर्यंतची ३५० पक्की बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. त्यामुळे हा २४ मीटरचा रस्ता ३० मीटर इतका रुंद होणार असून लोकमान्यनगर, सावरकरनगरमधील वाहतूक कोंडीत त्यामुळे घट होणार आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पुन्हा रस्ते रुंदीकरण मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत सोमवारी वागळे इस्टेट भागात महापालिकेने कारवाई केली. बांधकामांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेची पथके वागळे इस्टेटमधील कामगार नाक्यावर सकाळी पोहचली. या पथकांनी बांधकामे तोडण्याची कारवाई सुरू करताच अनेकांनी दुकानांमधील साहित्य इतरत्र हलविण्यास सुरुवात केली. काही जणांनी कामगार रुग्णालय वसाहतीच्या आवारातील मोकळ्या जागेत साहित्य नेऊन ठेवले. सहित्याची उठाठेव करताना अनेकांची दमछाक झाल्याचे दिसून आले. त्यानंतर कामगार रुग्णालय नाका ते ज्ञानेश्वरनगपर्यंतच्या मार्गावरील ३५० बांधकामे पथकाने जमीनदोस्त केली. त्यामध्ये २५० व्यावसायिक बांधकामे तर १०० निवासी बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. जेसीबीच्या साहाय्याने ही बांधकामे तोडण्यात आली.

गाळ्यांवर कारवाई

नितीन कंपनी जंक्शन येथून वागळे इस्टेटमधील इंदिरानगरच्या दिशेने जाणारा मार्ग अरुंद असून या ठिकाणी गर्दीच्या वेळेत प्रचंड वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. त्यात या मार्गावरील कामगार रुग्णालयाच्या संरक्षक भिंतीला खेटूनच असलेल्या गाळ्यांमध्ये अनेकांनी दुचाकी आणि रिक्षा गॅरेज थाटले होते. या ठिकाणी दुरुस्तीसाठी येणाऱ्या रिक्षा आणि दुचाकी रस्त्यावरच उभ्या केल्या जायच्या. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होऊन या ठिकाणी कोंडी व्हायची. रस्ता रुंदीकरणासाठी महापालिकेने हेच गाळे जमीनदोस्त केल्यामुळे आता कोंडी सुटण्यास मदत होणार आहे.

बाधितांचे पुनर्वसन करणार

कामगार रुग्णालय भागातील रस्त्यावरील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी येथील रस्ता ३० मीटर रुंद करण्यात येणार आहे. या रुंदीकरणासाठी २५० व्यावसायिक तर १०० निवासी अशी एकूण ३५० बांधकामे तोडण्यात आली आहेत. ३० मीटर रस्ता रुंद केल्यानंतर त्यालगतच २५० व्यावसायिकांचे पुनर्वसन करण्यात येईल. त्यामध्ये कुणाचे पुनर्वसन राहिले तर त्याचे अन्य ठिकाणी पुनर्वसन करण्यात येईल. त्याचप्रमाणे १०० निवासी बांधकामांतील कुटुंबांचे भाडे तत्त्वावरील योजनेच्या घरांमध्ये तात्पुरते पुनर्वसन करण्यात आले असून त्यांना बीएसयूपीच्या घरे दिली जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.