अंबरनाथ: मद्यधुंद ट्रेलर चालकाने उलट दिशेने ट्रेलर चालवत पोलिसांच्या गाडीसह किमान ५० वाहनांना धडक दिल्याची खळबळजनक घटना अंबरनाथजवळ घडली आहे. या ट्रेलर चालकाला पोलीस आणि रिक्षाचालकांनी पाठलाग करत पकडले आहे. काटई अंबरनाथ राज्यमार्गावर गुरुवारी दुपारी ही घटना समोर आली.

अंबरनाथहून डोंबिवलीच्या दिशेने जाणाऱ्या बदलापूर पाईपलाईन रोडवर हा अपघात घडला. नेवाळी नाका येथून बदलापूरच्या दिशेने निघालेल्या एका भरधाव ट्रेलरने नेवाळी नाक्यावर एका वाहनाला जोरदार धडक दिली. त्यानंतर पालेगाव, अंबरनाथ आनंदनगर पोलीस चौकी, वैभव हॉटेल चौक, सुदामा हॉटेल चौक असा संपूर्ण रस्ता भरधाव वेगात मार्गिकेवर उलट्या दिशेने ट्रेलर चालवत हा चालक निघाला. मार्गात समोर येणाऱ्या प्रत्येक वाहनाला त्याने धडक देत ट्रेलर पुढे नेला. यात कार, दुचाकी, रिक्षा, इतकेच नव्हे, तर पोलिसांच्याही गाडीला त्याने धडक दिली. तर मार्गातीलच एका दुचाकीस्वाराला त्याने रॉडने मारहाण करून जखमी केले.

Uday Samant On Shivsena Thackeray group
Uday Samant : “ठाकरे गटाचे ४ आमदार, ३ खासदार अन् काँग्रेसचे ५ आमदार…”, शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “उद्या पहिला ट्रेलर…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
auto driver who helped saif ali khan says not able to work
सैफला रुग्णालयात नेणाऱ्या रिक्षा चालकाने व्यक्त केली नाराजी; म्हणाला, “मी घाबरलोय कारण…”
dharavi adani land loksatta
३१९ कोटी रुपयांत ५८ एकर भूखंड अदानींकडे, धारावीकर मुलुंडवासीयांचे शेजारी
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला असता तर…
Retired Soldier Kills Wife, Disposes of Body Parts in Hyderabad Lake
Crime News : याला माणूस तरी कसं म्हणावं? पत्नीची हत्या केली अन् मृतदेहाचे तुकडे कुकरमध्ये शिजवले, निवृत्त जवानाचे क्रूर कृत्य
Ajit Pawar avoided to sitting next to sharad pawar
Ajit Pawar : शरद पवारांच्या बाजूला बसणं का टाळलं? अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “माझा आवाज…”
Ladki Bahin Yojana
Ladaki Bahin Yojana : “पुढच्या वेळी आईची मते मागू नका, तुमच्या…”, लाडकी बहीण योजनेतून वगळलेल्या कचरा वेचणाऱ्या महिलेचा संताप

शिवाजीनगर पोलीस आणि आसपासचे काही रिक्षाचालक हे पाठलाग करत असल्याने मद्यधुंद ट्रेलर चालकाने आनंदनगर एमआयडीसी परिसरात ट्रेलर नेला. मात्र, यावेळी ट्रेलरचा वेग जास्त असल्याने तो रस्त्याच्या कडेला जाऊन पलटला. तात्काळ पोलिसांनी या ट्रेलर चालकावर शिताफीने पकडून बेड्या ठोकल्या. दरम्यान, वाहनांना दिलेल्या या धडकांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र काही वाहनचालक व पादचारी जखमी झाले आहेत. तसेच या विचित्र प्रकारात किमान ५० हून अधिक गाड्यांचे नुकसान झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. वाहतूक पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Story img Loader