ठाणे : नवउद्योजक घडवून त्यांना बळ देण्याचे धोरण शासन अतिशय गांभिर्याने राबवित आहे. महाराष्ट्राने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत गेल्या वर्षात ५ हजार १६ उद्योजक तयार करण्याबरोबरच गेल्या नऊ महिन्यांत १३ हजार २५६ नवउद्योजक तयार केले, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ठाण्यातील कार्यक्रमात बोलताना दिली. हे शासन उद्योग क्षेत्रासंबंधी चांगले निर्णय घेत असून या शासनाकडून कोणत्याही उद्योजकांवर अन्याय होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे येथील टीप टॉप प्लाझा येथे लक्ष्यवेध इन्स्टिटयूटतर्फे ‘बिझनेस जत्रा २०२३’ चे आयोजन करण्यात आले असून त्याचे उद्घाटन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात त्यांनी उद्योजकांशी संवाद साधला. हे शासन उद्योग क्षेत्रासंबंधी चांगले निर्णय घेत आहे. या शासनाकडून कोणत्याही उद्योजकांवर अन्याय होणार नाही. खाजगी उद्योग क्षेत्रातील उद्योजकांनी शासनाच्या धोरणांवर विश्वास ठेवून शासनासोबत यावे आणि मुख्यमंत्री रोजगार योजना, पंतप्रधान विश्वकर्मा योजना यासारख्या योजनांना यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन सामंत यांनी यावेळी केले.

हेही वाचा – अस्वच्छ ठिकाणी जमिनीवर लाटून तयार केल्या जात आहेत पुर्‍या, भाईंदरमधील कारखान्यावर छापा

नवउद्योजक घडवून त्यांना बळ देण्याचे धोरण शासन अतिशय गांभिर्याने राबवित आहे. महाराष्ट्राने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत गेल्या वर्षात ५ हजार १६ उद्योजक तयार केले आणि आता गेल्या नऊ महिन्यांत १३ हजार २५६ नवउद्योजक उभे राहिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक मोठ्या प्रकल्पांसोबत १ कोटी ३७ हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत. रत्नागिरीत कोकाकोलाचा पहिला मोठा प्रकल्प उभा करीत आहोत. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोका-कोलाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सांगितले की, आमच्याकडे तज्ज्ञापासून ते कामगारांपर्यंत सर्व काही आहे. याबरोबरच इतर सर्व आवश्यक सुविधाही आहेत. यावर कोका-कोलाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी १ हजार ५०० कोटी रुपयांची अतिरिक्त गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले, असे ते म्हणाले.

गडचिरोलीसारख्या जिल्ह्यातसुद्धा मोठा प्रकल्प उभा राहत आहे. तेथे सर्वात मोठी स्मॉल स्केल इंडस्ट्री उभी राहणार आहे. यासाठी ५ हजार एकर जागा भूसंपादित केली जाणार आहे. मुख्यमंत्री त्याबाबत अत्यंत प्रयत्नशील असून ते यशस्वी सिद्ध झाले आहेत. स्मॉल स्केल इंडस्ट्री बळकट होण्यासाठी शासनही पूर्ण क्षमतेने नवउद्योजकांच्या पाठीशी उभी आहे आणि यापुढेही राहील असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भव्य दूरदृष्टी असलेले नेतृत्व आहे. त्यांच्या संकल्पनेतून साकारलेली पंतप्रधान विश्वकर्मा योजना राज्यात मिशन मोडमध्ये राबविली जाईल. या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीच्या माध्यमातून देश निश्चितच बलवान होईल. या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घरात लघुउद्योजक तयार होतील. ही योजना राबविण्यासाठी केंद्राने महाराष्ट्र राज्यासाठी ५०० कोटी रुपयांचा निधी लागलीच मंजूरही केला आहे. यातून गावेही बळकट होतील, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा – अस्वच्छ ठिकाणी जमिनीवर लाटून तयार केल्या जात आहेत पुर्‍या, भाईंदरमधील कारखान्यावर छापा

या उद्घाटन कार्यक्रमाला आमदार निरंजन डावखरे, आमदार प्रताप सरनाईक, माजी महापौर नरेश म्हस्के, संजीव नाईक, ॲड. संदीप केकाणे, अरुण सिंह, निनाद जयवंत, निलेश सांबरे, गणेश दरेकर, अतुल राजोळी, डॉ. अतुल राठोड यांच्यासह उद्योजक उपस्थित होते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Under the cm employment creation scheme more than twice as many new entrepreneurs have been created as compared to last year uday samant claim ssb
Show comments