कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी भागातील हनुमान नगर भागात एका बेरोजगार मुलाने पैशाच्या कारणावरुन आपल्या आईचा नायलॉनच्या दोरीने गळा आवळून घरात खून केला. हा खुनाचा प्रकार लपविण्यासाठी त्याने तिला घराच्या छताला लटकून तिने आत्महत्या केल्याचा बनाव रचला. या मुलाचा हा बनाव पोलिसांनी उघड करुन त्याला अटक केली. मंगळवारी रात्री हा प्रकार घडला आहे. सरोजा पुमणी असे मयत महिलेचे नाव आहे. रवी पुमणी (३४, रा. प्रभुकुंज सोसायटी, मनीषा गॅस एजन्सी गोदाम जवळ, हनुमान नगर, कल्याण पूर्व) असे आरोपी तरुणाचे नाव आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : गुटका खाण्यास नकार आणि चक्क रहिवाशावर चाकूने वार; डोंबिवली त्रिमूर्तीनगर मधील घटना

पोलिसांनी सांगितले, रवी पुमणी हा बेरोजगार आहे. त्याला नोकरी, व्यवसाय नसल्याने तो नियमित आई सरोजा हिच्याकडे बाहेर उधळपट्टी करण्यासाठी पैशाची मागणी करत होता. सतत पैसे देणे शक्य नसल्याने आई सरोजा त्याला नकार देत होती. त्याचा राग रवीला येत होता. मंगळवारी रात्री दीड वाजता आई सरोजा, मुलगा रवी दोघे जण घरात होते. त्यांच्यात किरकोळ कारण आणि पैशांच्या विषयावरुन वाद झाला. सरोजाने त्याला पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे संतप्त झालेल्या रवीने आईशी भांडण उकरुन काढून तिला बेदम मारहाण केली.

हेही वाचा : स्मार्ट’ कल्याण डोंबिवली पालिकेत कनिष्ठ अभियंता पदासाठी सेवानिवृत्तांची फौज? ; नवोदित उमद्या अभियंत्यांमध्ये तीव्र नाराजी

रागाच्या भरात त्याने आईला जमिनीवर पाडून तिच्या गळ्याला नायलॉनच्या दोरीचा फास लावून तिला जागीच ठार मारले. आईचा खून केल्यानंतर हे प्रकरण आता आपल्या अंगलट या भीतीने रवीने आईने सरोजाने गळफास घेऊन आत्महत्या केली. असा बनाव रचला. त्याने मृत पावलेल्या आईला दोरीच्या साहाय्याने घरातील पंख्याला लटकवले. शेजाऱ्यांना आपण घरात आपल्या खोलीत झोपलो असताना आपल्या नकळत आईने गळफास घेतला असल्याचे सांगण्यास सुरुवात केली.

हेही वाचा : ठाणे : मुंब्रा बाह्यवळण मार्गावर वाहतूक कोंडी

कोळसेवाडी पोलिसांना या गुन्ह्याची माहिती मिळाली. पोलिसांनी रवीची पार्श्वभूमी तपासली. त्याची सखोल चौकशी केली. या चौकशीत त्याने आपण आईचा नायलॉनच्या दोरीने गळा आवळून खून केल्याची कबुली दिली. कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक दिगंबर पवार यांच्या तक्रारीवरुन रवी पुमणी विरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unemployed son murder own mother in kolsewadi thane tmb 01