मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राज्यातील सरकार कधी कोसळतेय म्हणून विरोधी पक्ष मोठे डोळे लावून बसला आहे. परंतु तो त्यांचा भ्रम आहे. त्यांच्या पदरी निराशच येणार आहे. शिंदे, फडणवीस सरकार अधिक ताकदीने काम करत असून राज्याचा सर्वांगिण विकास करण्यासाठी कटिबध्द आहे, असे वक्तव्य केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज येथे केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- ठाण्यातील रस्त्यालगत राडारोड्याचे ढिग कायम ; आयुक्तांच्या आदेशानंतरही संबंधित विभागाचे दुर्लक्ष 

कल्याण लोकसभा क्षेत्रातील भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद आणि पक्ष वाढीच्या दृष्टीने विचार करण्यासाठी केंद्रीय मंत्री ठाकूर डोंबिवलीत आले आहेत. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. कल्याण लोकसभा क्षेत्रात भाजप लोकप्रियता आणि संघटनात्मक वाढीसाठी प्रयत्न करत आहे. आमचा पक्ष कार्यकर्त्यांच्या एकनिष्ठेवर अवलंबून आहे. सत्तेत असुनही पंतप्रधान नरेंद्र मोदी आपले संघटनेप्रती असलेले कर्तव्य, दायित्व निभावत आहेत, असे ठाकूर म्हणाले.

हेही वाचा- “नव उद्योजकांना दिशा देण्यासाठी ‘ब्राह्मण बिझनेस नेटवर्क’सारख्या संस्थांची गरज”; उपमुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

कल्याण लोकसभा क्षेत्रात बाळासाहेबांची शिवसेना, भाजप एकत्रितपणे लढून मोठ्या मताधिक्याने निवडून येऊ, असा विश्वास ठाकूर यांनी व्यक्त केला. युपीए सरकारच्या काळात जे झाले नाही ती कामे आता झपाट्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात मार्गी लागत आहेत. रस्ते, रेल्वे, मेट्रो अशा कामांसाठी कोट्यवधीचा निधी उपलब्ध करुन दिला जात आहे. यापूर्वीच्या युपीए सरकारच्या काळात यासाठी हात आखडता घेतला जात होता, असे ते म्हणाले.

हेही वाचा- ठाणे : कळव्यात मोटारीने घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी नाही

युपीए सरकारने कधीच महाराष्ट्राला दिले नाही, ते देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतला. रखडलेले सर्व प्रकल्प मार्गी लावले जात आहेत. राज्यातील सरकार जनतेच्या विकासासाठी कटिबध्द आहे. ते मजबूत राहिल, असा विश्वास ठाकूर यांनी व्यक्त केला. यापुढील फेरीत कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रातील विकास कामांचा पुन्हा आढावा घेतला जाईल. आता विकास कामे प्रगतीपथावर आहेत, अशी माहिती आहे, असे मंत्री ठाकूर म्हणाले. यावेळी कल्याण लोकसभा समन्वयक आ. संजय केळकर, आ. कुमार आयलानी, आ. गणपत गायकवाड, जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, माजी आ. नरेंद्र पवार उपस्थित होते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Union minister anurag thakur on shinde fadnavis government dpj dpj