ठाणे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
निर्सगसौंेदर्याने नटलेले असे मुंबईजवळील सर्वात जवळचे थंड हवेचे ठिकाण ‘माथेरान’ हे आहे. मुंबईपासून एकशे दहा किलोमीटरवर असलेले माथेरान हे थंड हवेचे ठिकाण प्रदूषणमुक्तदेखील आहे. पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी येथे वाहनबंदी आहे.
येथील खास वैशिष्टय़ असणारी येथील मिनी ट्रेन पाहून अगदी बालगीतातल्या झुकझुकगाडीची आठवण होते. वाफेच्या इंजिनावर चालणारी ही गाडी माथेरानला नेता नेता आजूबाजूच्या मनोहारी निसर्गाचे दर्शन घडविते.
पर्यावरण दक्षता मंचतर्फे माथेरानचे हे निसर्गसौंदर्य पाहण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क-२५४०००१२ किंवा अविनाश भगत-९८९२०६१८९९
- कधी : १६ आणि १७ जुलै
- कुठे : माथेरान, नेरळ (पू.)
सुरेल वैकुंठाचे पंढरी रूप..
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाचे सावळे रूप पाहिल्यानंतर आपले मन प्रसन्न होते. अशाच विठ्ठलाची जेव्हा संगीतातून स्तुती केली जाते तेव्हा वातावरणही भक्तिमय होते. ‘कानाडाऊ विठ्ठलु कर्नाटकु’ हे गाणे ऐकल्यानंतर मन चिपळ्या आणि भजनामध्ये नादमय होऊन जाते. ब्रह्मांड कट्टा सामाजिक सांस्कृतिक मंडळार्फे ‘बोलावा विठ्ठल’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भक्तिगीत, अभंग, आरती यात रंगलेला सुरेल वैकुंठाचे पंढरी रूप ठाणेकर रसिकांना अनुभवता येणार आहे. वर्षां गंद्रे, हेमंत मयेकर, शीतल बोपलकर, कविता सपकाळे आणि अरुण दळवी हे त्यांच्या सुरेल आवाजातून पंढरीचा विठ्ठल रंगवणार आहे. या वेळी संवादिनीवर स्वाती सोनगावकर, तबला शैलेश बांगर, निवेदन मधुगंधा इंद्रजीत त्यांना साथ देणार आहेत.
- कधी : शनिवार, १५ जुलै,
- केव्हा : सायंकाळी ६ वाजता
- कुठे : स्वस्तिक पार्कच्या मुख्य दरवाजाजवळ, गणपती मंदीर ब्रह्मांड, ठाणे</li>
‘मंटो’ मराठीत
स्वप्निल, दिवाणखानी आणि छानछोकी वर्णनात रमलेल्या उर्दू साहित्याला वास्तव दुनियेची ओळख देणारे श्रेष्ठ कथालेखक सआदत हसन मंटो यांच्या काही निवडक कथा मराठी वाचकांना उपलब्ध होणार आहेत. ‘मंटोच्या निवडक कथा’ आणि ‘प्रतीक्षा मंटोची’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन येत्या रविवारी १७ जुलै रोजी ठाण्यात होणार आहे. डॉ. वसुधा सहस्रबुद्धे यांनी मंटोंच्या कथांचा अनुवाद केला आहे. ऊर्दू आणि मराठी भाषेचे गाढे अभ्यासक डॉ. राम पंडित यांच्या हस्ते पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. वेद राही कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. डॉ. नरेंद्र मोहन प्रमुख पाहुणे तर डॉ. रवींद्र शोभणे आणि चंद्रकांत भोंजाळ मंटोंविषयी बोलणार आहेत. विनम्र आणि धनश्री मंटोंच्या कथांचे अभिवाचन करणार आहेत. हर्षदा बोरकर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत.
- कधी : रविवार, १७ जुलै,
- केव्हा : सकाळी १०
- कुठे : ग. ल. जोशी सभागृह, तिसरा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे (प.)
माउलीची ‘छाया’ स्लाइड शोच्या माध्यमातून
ज्ञानेश्वरीमध्ये ‘वारी’ म्हणजे येरझारा. वारकरी संप्रदायात पंढरीच्या वारीला नितांत महत्त्व आहे. वर्षांतून एकदा वारकऱ्यांनी पंढरीच्या विठुरायाचे दर्शन घ्यावे, असा प्रघात आहे. गळ्यात तुळशीमाळा, कपाळी बुक्का, कानाच्या दोन्ही पाळ्यांना गोपीचंदन, खांद्यावर पताका आणि हातात टाळ-मृदुंग अशा थाटात वारकरी वारीच्या महासोहळ्यात दंगून जातात. पंढरपूरच्या वारीचा हा सोहळ अभूतपूर्व असतो. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचे ते एक अंग आहे. हे अंग शहरातील मंडळींना पाहता यावे यासाठी माजीवाडा सेवाभावी ज्येष्ठ नागरिक संस्थेतर्फे पंढरीच्या वारीतील विशेष छायाचित्रांचा स्लाइड शो दाखविण्यात येणार आहे. शिरीष साने आणि अजय महाजन यांची छायाचित्रे यामध्ये दाखवण्यात येणार आहेत.
- कधी – शनिवार, १६ जुलै
- केव्हा : सायंकाळी ५ वाजता
- कुठे : श्री चांगाईमाता मंदिर, माजीवाडा, ठाणे (प.)
ज्ञानदेव म्हणे
मराठी संत साहित्याचा पाया रचणाऱ्या संत ज्ञानेश्वरांच्या रचना म्हणजे शीतल चांदणेच जणू. गेल्या सात दशकांहून अधिक काळ ज्ञानेश्वरांच्या ओव्यांनी मराठी मने समृद्ध झाली आहेत. आषाढी एकादशीनिमित्त शुक्रवारी, १५ जुलै रोजी दुपारी साडेचार वाजता ‘ज्ञानदेव म्हणे’ ही ज्ञानेश्वरांच्या रचनांवर आधारित विशेष गाण्यांची मैफल सादर होत आहे. माधुरी करमरकर, धनंजय म्हैसकर गाणी सादर करणार असून धनश्री लेले निरूपण करणार आहेत. यानिमित्ताने एकादशीच्या संध्याकाळी ज्ञानदेवांच्या सुश्राव्य रचना ऐकण्याची संधी ठाणेकर रसिकांना उपलब्ध झाली आहे.
- कधी : शुक्रवार, १५ जुलै,
- केव्हा : दुपारी – ४.३० वाजता
- कुठे : गडकरी रंगायतन, ठाणे
तरुणांचा.. ‘सा से सा’ सफर नगमों का
जुन्या गाण्यांच्या मैफलीत आठवणींना उजाळा देणे आणि स्वरांमध्ये रमणे अनेकांना भावते. १९५०च्या काळातील बॉलीवूडचा सुवर्णकाळ अनुभवताना ज्येष्ठ मंडळी तर नॉस्टाल्जिक होतात. १९५० ते २०१० दरम्यानची पन्नास निवडक गाणी एकाच व्यासपीठावर ऐकण्याची संधी तरुण कलाकारांच्या ‘पूर्वाध’ संस्थेने आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात मिळणार आहे.
राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर सुवर्ण पदक पटकावलेल्या तरुणांनी पारितोषिकापुरती कला सीमित न ठेवता संगीताला व्यापक स्वरूप द्यायचे ठरवले आणि निर्मिती झाली ‘सा से सा’ सफर नगमों का या कार्यक्रमाची. जुन्या गाण्यांची सुरेल मैफल या निमित्ताने अनुभवायला मिळणार आहे.
तरुणांनी तयार केलेल्या या नृत्य-सांगीतिक महोत्सवाचे रूप प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. प्रवेश मर्यादित असल्याने प्रथमेश गावंडे ९००४४२८०५३ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
- कधी : सोमवार १८ जुलै
- कुठे : डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृह, ठाणे
- केव्हा : दुपारी ४.३० वाजता
ठाण्यात अनोखा नाटय़ानुभव!
ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘वाडा चिरेबंदी’ आणि ‘मग्न तळ्याकाठी’चा अनोखा सलग नाटय़ानुभव शनिवार, १६ जुलै रोजी ठाण्यात प्रथमच सादर होणार आहे. ‘वाडा चिरेबंदी’ (भाग-१) दु. ४.३० वा. तर ‘मग्न तळ्याकाठी’ (भाग-२) रात्री ८.३० वा. गडकरी रंगायतनमध्ये सादर होणार आहेत. ‘वाडा चिरेबंदी’ जिथे संपते त्यानंतरचा १० वर्षांचा कालावधी, त्यातली स्थित्यंतरे, व्यक्तिरेखांचा विकास, त्यांचे बदलणारे अंतरंग ‘मग्न तळ्याकाठी’मध्ये व्यक्त होते. त्यामुळे बदलती एकत्र कुटुंबपद्धती, बदलता काळ आणि भावभावनांचा, नात्यांचा हा भव्य पट एकाच दिवशी, एकाच थिएटरमध्ये एकापाठोपाठ बघणे म्हणजे नाटय़रसिकांसाठी एक पर्वणीच ठरते. या अभिनव प्रयोगात निवेदिता सराफ, वैभव मांगले, प्रसाद ओक, भारती पाटील, पौर्णिमा मनोहर, प्रतिमा जोशी, नेहा जोशी, दीपक कदम या ताकदीच्या कलावंतांसोबत दुसऱ्या भागात सिद्धार्थ चांदेकर, राजश्री ठाकूर आणि चिन्मय मांडलेकर हे आजचे आघाडीचे कलावंत आहेत.
- कधी : शनिवार, १६ जुलै
- केव्हा : दुपारी ४.३० वाजता आणि रात्री ८.३०
- कुठे : गडकरी रंगायतन, ठाणे (प.)
‘त्या’ दोघांचे बंध छायाचित्रातून..
दोन आयुष्यांना आणि कुटुंबाला जोडणारा लग्न सोहळा प्रत्येक जोडप्यासाठी खास असतो. लग्न सोहळ्यातील प्रत्येक क्षण कालांतराने आठवणींचा सोहळा होतो. आप्तेष्टांच्या भेटीचे, लग्नविधींच्या प्रसंगाचे चित्रण एकाच संग्रहात पाहताना अनेकांचे डोळे पाणवतात. लग्न हा सोहळा झाल्यापासून लग्नाच्या छायाचित्रणालादेखील विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. केवळ छायाचित्रणाला महत्त्व नाही तर छायाचित्र पाहून जागवणाऱ्या आठवणींना कॅमेरा चित्रबद्ध करत असतो. खास लग्नासाठी काढल्या जाणाऱ्या छायाचित्रांचे प्रदर्शन फोटो सर्कल सोसायटीतर्फे आयोजित करण्यात आले आहे. प्रवेश विनामूल्य आहे. नावनोंदणीसाठी संपर्क – ९७०२५५२२३३ किंवा ९८१९९७७९०८
- कधी : रविवार, १७ जुलै
- केव्हा : सायंकाळी ५.३० वाजता
- कुठे : ठाणे कलाभवन, बिग बाझारजवळ, कापूरबावडी, ठाणे (प.)
साल्सा, बचाता, मेरँगे आणि बरंच काही..
संततधार पाऊस, रेल्वेचा खोळंबा, रोजची दैनंदिन कामे या सर्वाचा ताण हे नेहमीचेच दुखणे होऊन बसले आहे. शहरातील बिझी रुटीनमधून लोकांना तणावमुक्त करण्यासाठी ठाण्याच्या डिफरंट स्ट्रोक्स या नृत्यशाळेचे संचालक नकुल घाणेकर यांनी एका नृत्य शिबिराचे आयोजन केले आहे. हे नृत्यशिबीर गोखले रोडवरील डान्स स्टुडियोमध्ये आयोजित केले गेले आहे. यात सालसा, मेरँगे, बचाता, जाइव, चा-चा या नृत्यशैलींचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. मोफत नोंदणीसाठी ९८१९४०६२३५ किंवा ९८७०२९८३०३ या मोबाईल क्रमांकांवर आपले नाव, पत्ता, ई-मेल आयडी, वय आणि फोन नंबर एसएमएस किंवा व्हॉटस्अॅप करावा. हे शिबीर १० ते ७० या वयोगटासाठी खुले आहे. शिबीर १९ आणि २२ जुलै सकाळी ७ ते ९, या वेळेत डिफरंट स्ट्रोक्स बेसमेंट, वासुदेव सदन, चव्हाण दत्त मंदिरासमोर, रामवाडी, गोखले रोड येथे घेण्यात येणार आहे.
- कधी : १९ आणि २२ जुलै
- कुठे : डिफरंट स्ट्रोक्स, गोखले रोड, ठाणे (प.) आणि मिनी थिएटर, काशिनाथ घाणेकर नाटय़गृह, ठाणे (प.)
नृत्याविष्कार आणि समाजसेवकांचा गुणगौरव..
नृत्य आणि संगीत जेव्हा एकमेकांच्या हातात हात घालून चालतात तेव्हा त्या क लेचे सादरीकरण अतिशय सुंदर होते. असाच नृत्याचा आविष्कार ठाणेकरांना शनिवारी सायंकाळी अनुभवता येणार आहे. या वेळी स्वाती कोळ्ळे यांचा कथक नृत्याविष्कार सादर होणार आहे. या वेळी समाजातली काही व्यक्ती सामाजिक कार्य करीत असतात. समतोल फाऊंडेशनचे विजय जाधव, देहदान करणारे विनायक जोशी दोनशे मुले दत्तक घेणाऱ्या उषा बाळ, विद्यादान करणाऱ्या रंजना कुलकर्णी, नेत्रहीन मुलांसाठी काम करणाऱ्या शुभांगी घाग या पाच व्यक्तींचा सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला अतिथी म्हणून डॉ. विद्याधर ओक उपस्थित राहणार आहे.
- कधी : शनिवार, १६ जुलै,
- केव्हा : सांय.५ ते ८
- कुठे : विद्यालंकार सभागृह, डॉ. बेडेकर विद्यामंदिर, ठाणे (प.)
लावणीची नजाकत
महाराष्ट्राची शान असलेली लावणी फडावर प्रत्यक्षात अनुभवणे एक वेगळाच आनंद. दूरचित्रवाणीवर पाहताना जितके लावण्य या लावणीतून प्रेक्षकांना भासते त्याहून अधिक प्रत्यक्षात पाहताना लावणीचा आनंद लुटता येतो. काळानुसार लावणीचे प्रकार बदलले. पारंपरिक लावणीत आधुनिकता येत संमिश्र लावणी प्रेक्षकांना भावली. वेगवेगळ्या छटा दर्शवणाऱ्या लावण्या एकाच व्यासपीठावर पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. प्रतिबिंब प्रॉडक्शन्स, आलाप इंटरनॅशनल थिएटर यांच्या तर्फे ‘सैराट झाली रात’ या लावणीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
- कधी :शुक्रवार १५ जुलै
- केव्हा दुपारी ४.३० वाजता
- कुठे : विष्णुदास भावे, वाशी
एक सुरमयी सायंकाळ..
शास्त्रीय संगीतात रागांना अतिशय महत्त्व आहे. या रागांमध्ये भावनिक नाते जडलेले असते. प्रत्येक प्रहारानुसार हे राग वेगळे होतात आणि आपल्या मनामध्ये चाललेल्या भावभावनांचा खेळ खेळत आपल्याला साथ देत असतात. सूर-ताल रसिकांचे मन रिझवतात. अशाच एका ‘संगीत की बात रूबेन के साथ’ अशा एका सुरेल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ संगीतकार डी. एस. रूबेन यांच्या संकल्पनेतून संगीतातील रागांवर आधारित हा कार्यक्रम आहे. तर सूरसमंदर हे तबलावादक तब्बल सव्वा वर्षांनी आपल्या हाताची जादू काळ्या शाईवर उतरवणार आहेत. व्हॉइस ऑफ रफी प्रकाश कणेकर, व्हॉइस ऑफ किशोर किरण चंदोला तर शास्त्रीय गायिका मुक्ता साठे आदी कलाकर आपली कला सादर करतील. तबला साथ शैलेश बांगर तर ध्वनी चंद्रकांत करणार आहेत.
- कधी – रविवार १७ जुलै,
- केव्हा : सायंकाळी ६ वाजता
- कुठे : सांजस्नेह ज्येष्ठ नागरिक सभागृह, ब्रह्मांड पोलीसचौकीमागे, आझाद नगर, ठाणे