उत्तन कचराभूमी आगप्रकरण
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
उत्तन येथील कचऱ्याला लागलेल्या आग प्रकरणात हलगर्जीचा ठपका ठेवून मीरा-भाईंदर महापालिकेचे प्रभारी अग्निशमन अधिकारी धनंजय कनोजे यांना ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावण्यात आली आहे. उत्तन येथील प्रकल्पाबाहेर साठवण्यात येत असलेल्या कचऱ्याला रविवारी दुपारी मोठी आग लागली होती. या वेळी कर्तव्यात कसूर केल्याच्या कारणावकून कनोजे यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे.
उत्तन येथील घावगीच्या डोंगरावर असलेल्या प्रकल्पाबाहेरील कचऱ्याला रविवारी दुपारी आग लागली होती. या आगीमुळे धुराचे लोट निर्माण होऊन आसपासच्या रहिवाशांना त्रास सहन करावा लागला होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतरही पुढील दोन ते दिवस कचरा धुमसतच आहे. आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर महापालिकेचे उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांनी प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारी कनोजे यांना आग लागलेल्या ठिकाणी जायचे आदेश दिले होते. परंतु कनोजे यांनी त्याठिकाणी स्वत: न जाता आपल्या हाताखालील इतर अधिकाऱ्यांना त्यांनी घटनास्थळी पाठवले, त्यानंतरही पानपट्टे यांनी सातत्याने त्यांच्याशी संपर्क साधायचा प्रयत्न केला मात्र कनोजे यांनी त्यांचा फोन उचलला नाही, अशी माहिती पानपट्टे यांनी दिली. शहरात एवढी मोठी घटना होऊनदेखील आपले कर्तव्य बजावण्यात कनोजे यांनी कसूर केल्याप्रकरणी त्यांना प्रशासनाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटिशीचा चोवीस तासांत खुलासा करण्याबाबतही त्यांना सांगण्यात आले आहे.
दरम्यान कचऱ्याला लागलेल्या आगीवरून पालिका प्रशासन व ग्रामस्थ यांच्यात चांगलाच वाद रंगला होता. कचऱ्याला जाणूबुजून आग लावण्यात आली, पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी चार ते पाच व्यक्तींना आग लावताना पाहिले होते, असा आरोप करून प्रशासनाने अज्ञातांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
दुसरीकडे स्वत:चे अपयश झाकण्यासाठी प्रशासनाकडून असे खोटे आरोप करण्यात येत असल्याचे प्रत्युत्तर ग्रामस्थांनी दिले. अद्याप याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.