डोंबिवली : डोंबिवली येथील एमआयडीसीतील दोन महिन्यापूर्वी बांधण्यात आलेले सीमेंट काँक्रीटचे नवे कोरे रस्ते ठेकेदाराने रस्त्याखालील सेवा वाहिन्या खराब झाल्या आहेत, कारणे सांगून अनेक ठिकाणी खोदण्यास सुरुवात केल्याने रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. मागील ४० वर्षानंतर प्रथमच एमआयडीसी हद्दीत काँक्रीटचे रस्ते झाले आहेत. याचे समाधान रहिवाशांना आहे. या उंचवट्या रस्त्यांमुळे आपले बंगले, सोसायट्या मुसळधार पावसामुळे जलमय होत आहेत, याची जाणीव आणि त्रास रहिवाशांना होत आहे. तरीही घरा समोरील रस्ता काँक्रीटचा झाला आहे. खड्ड्यांपासून आपली मुक्तता झाली आहे. याचे समाधान रहिवाशांना आहे.

दोन महिन्यापूर्वी एमआयडीसी हद्दीत बांधण्यात आलेले नवे कोरे सीमेंट रस्त्याखालील सेवा वाहिनी खराब झाली आहे. जलवाहिनीला, रासायनिक सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिनीला गळती लागली आहे म्हणून खोदकाम करुन ती वाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेतले जात आहे. या खोदलेल्या ठिकाणी पुन्हा काँक्रीटचे ठिगळ लावून काम पूर्ण केले जात आहे. जागोजागी अशाप्रकारची खोदकामे केली जात असल्याने रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

pune speed breakers
पुण्यातील ‘इतके’ स्पीड ब्रेकर काढणार ? कारण काय
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
traffic jam at Khandala Ghat , traffic jam Mumbai Pune Expressway,
मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर खंडाळा घाटात प्रचंड वाहतूक कोंडी; दहा ते बारा किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा
khambataki ghat tunnel work loksatta news
खंबाटकी घाटातील नवीन बोगदा अंतिम टप्प्यात, पुणे – बंगळूरू महामार्गाचे दळणवळण होणार गतिमान
Railway Minister Ashwini Vaishnav talk about third and fourth tracks on Pune-Lonavala railway line
पिंपरी : पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले…
Pimpri Chinchwad Municipal Corporation,
पिंपरी-चिंचवडमध्ये महानगरपालिका प्रशासन ‘ॲक्शन मोड’वर! अनधिकृत बांधकामे, पत्राशेडवर कारवाई
Hinjawadi, Pimpri Chinchwad Municipal Corporation ,
पिंपरी-चिंचवड महापालिकेत आयटीनगरी हिंजवडीसह सात गावांचा समावेश का रखडला?
Katraj Kondhwa road traffic jam, Katraj Kondhwa road,
पुणे : कात्रज-कोंढवा रस्त्याबाबत मोठी घडामोड, आयुक्तांनी घेतली बैठक दिले आदेश !

हेही वाचा >>> डोंबिवलीतील आयरे गावातील बेकायदा बांधकामांना नोटिसा; बेकायदा बांधकामे भुईसपाट करण्याचे नियोजन

दोन महिन्याच्या काळात सात ते आठ वेळा नवीन कोरे काँक्रीट रस्ते रस्त्याखालील सेवा वाहिन्या खराब झाल्या आहेत, अशी कारणे देऊन रस्ते खोदण्यात आले. हे रस्ते तयार करण्यापूर्वीच रस्त्याच्या दोन्ही बाजुला सेवा वाहिन्या वाहून नेण्यासाठी स्वतंत्र भुयारी मार्गिका, भुयारी संरक्षित चेंबर (डक्ट) बांधणे आवश्यक होते. यामुळे अशाप्रकारची खोदाई ठेकेदाराला करावी लागली नसती. महावितरण, एमआयडीसी, सीईटीपी, दूरसंचार विभागाच्या सेवा वाहिन्यांमध्ये काही बिघाड झाले असते तर संबंधित विभागाने रस्ते खोदकाम न करता भुयारी मार्गातील आपल्या वाहिन्या पाहून त्या दुरुस्त केल्या असत्या. अशी कोणतीही पध्दत न वापरता एमएमआरडीएच्या ठेकेदाराने फक्त काँक्रीट रस्त्यांवर लक्ष दिले.

हेही वाचा >>> डोंबिवलीत रिक्षेच्या धडकेत पती-पत्नी गंभीर जखमी

आजुबाजुच्या सेवा वाहिन्यांसाठी स्वतंत्र सुविधा देण्यात यावी अशी मागणी सेवाधारक आस्थापनेने केली. काही उद्योजकांनी ठेकेदाराला रस्त्याच्या दुतर्फा सेवा वाहिन्या टाकण्यासाठी स्वतंत्र टाकण्याची मागणी केली होती. त्याकडे ठेकेदाराकडून दुर्लक्ष करण्यात आले, असे एमआयडीसीतील उद्योजक, रहिवाशांनी सांगितले. एमआयडीसीतील डाॅ. नानासाहेब धर्माधिकारी रस्त्यावर, मिलापनगर भागातील पोटोबा हाॅटेलच्या गल्लीतील गेल्या महिन्यात बांधलेला सिमेंट रस्ता खोदण्यात आला. या रस्त्यांच्या परिसरात खासगी मोठी रुग्णालये आहेत. या रस्त्यांवरुन सतत रुग्णवाहिका धावत असतात. त्यांना या खोदकामामुळे अडथळे येत आहेत.

मागील दीड वर्ष या भागातील रहिवासी, उद्योजक, रुग्णालय चालकांनी सीमेंट रस्ते होणार आहेत म्हणून सर्व प्रकारचे त्रास सहन केले. आता काँक्रीट रस्ते झाले तर ते खोदकाम करुन तोडले जाऊन पुन्हा अडथळे उभे केले जात आहेत. याविषयी रहिवासी तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. कल्याण ग्रामीणचे आ. प्रमोद पाटील यांच्या मतदारसंघात हा भाग येतो.या खोदकामा विषयी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून हे प्रकार थांबविण्यासाठी आ. राजू पाटील यांनी प्रयत्न करावेत, अशी रहिवाशांची मागणी आहे.

Story img Loader