लोकसत्ता खास प्रतिनिधी
कल्याण : येथील पूर्व भागातील कोळसेवाडी भागात सोमवारी रात्री मद्यपान केलेल्या पाच ते सहा तरुणांनी या भागातील रस्त्यावर उभ्या असलेल्या पाच ते सहा मोटारींची तोडफोड केली. वाहन मालकांनी या प्रकाराविषयी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
वाहन मालकांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे सोमवारी रात्री तरुणांचे एक टोळके रस्त्यावर फिरत होते. त्यांनी मद्यपान केले होते. कोळसेवाडी भागात आल्यानंतर त्यांनी हातात काठ्या घेऊन रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांच्या काचा काठ्या, दगडांनी फोडून टाकल्या. परिसरातील काही रहिवासी तरुणांच्या ओरड्याने जागे झाले. ते मद्यपान करुन फिरत असल्याने त्यांना विरोध करण्यासाठी कोणीही बाहेर पडले नाही.
हेही वाचा… ठाणे : गावदेवी भाजी मंडई इमारतीतील दुचाकी वाहनतळ बंदावस्थेच
सकाळी मोटारीजवळ आल्यावर वाहन मालकांना आपल्या वाहनांची मोडतोड अज्ञातांनी केल्याचे लक्षात आले. कल्याण पूर्व भागात गेल्या वर्षापासून गुन्हेगारी वाढत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.