कॉलेजविश्वातील वेगवेगळय़ा घडामोडी मांडणारे ‘कॉलेजच्या कट्टय़ावर’ हे सदर आता प्रत्येक महाविद्यालयात औत्सुक्याचा विषय बनले आहे. ठाणे जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांत होणारे/झालेले कार्यक्रम, स्पर्धा, सोहळे, परिसंवाद, मार्गदर्शन शिबिरे यांच्या वृत्तांना  प्रसिद्धी देणाऱ्या या सदरात आपल्या महाविद्यालयाशी संबंधित बातम्या तुम्ही पाठवू शकता. दर गुरुवारी प्रसिद्ध होणाऱ्या या सदरातून अशा बातम्यांना प्रसिद्धी दिली जाईलच; शिवाय महत्त्वाच्या कार्यक्रमांना ‘लोकसत्ता ठाणे’मध्ये वेळोवळी ठळकपणे स्थान दिले जाईल.
काय चाललंय आमचं?
प्रत्येक कॉलेजचा एक कट्टा असतो. हा कट्टा म्हणजे केवळ गप्पांचा अड्डा नसतो. तर महाविद्यालयीन जीवनातील आणि भावी कारकिर्दीतील अनेक गोष्टींना बळ देणारी ती एक संस्कृतीच असते. अशा कट्टय़ांवरूनच एखादा अभिनेता घडत असतो तर, अशाच कट्टय़ांवर एखाद्या वक्त्याला पहिलं व्यासपीठ मिळतं. व्हॅलेंटाइन डे, फ्रेंडशिप डे, महिला दिन.. अशा ‘विशेष’ दिवशी तर या कट्टय़ांचा उत्साह ओसंडून वाहात असतो. तुमचा हाच उत्साह कॅमेऱ्यात टिपून आम्हाला पाठवा. निवडक ‘कट्टा क्लिक’ना दर आठवडय़ाला ‘कॉलेजच्या कट्टय़ावर’मधून प्रसिद्धी दिली जाईल. फोटो पाठवताना त्याच्याशी संबंधित तपशीलही जरूर पाठवला.
आमचा पत्ता : लोकसत्ता ठाणे कार्यालय, कुसुमांजली, दुसरा मजला, कॉसमॉस बँकेच्या वर, गोखले रोड, नौपाडा, ठाणे (पश्चिम), ४००६०२ ई मेल:  newsthane@gmail.com फॅक्स :  २५४५२९४२.

Story img Loader