लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे: सुभेदारवाडा कट्टा, कल्याण विकास फाऊंडेशन आणि इनरव्हील क्लब ऑफ कल्याण यांच्या वतीने मोदकोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत स्पर्धकांनी पारंपरिक उकडीचे मोदक, आंबा उकडीचे मोदक, गुलकुंद मोदक, गुलाब पान मोदक, पनीर मोदक, अंजीर मोदक, बिटचे मोदक, कचोरी चाट मोदक, डाळीचे मोदक, गुळपापडी मोदक असे वैविध्य पुर्ण मोदक तयार केले होते.

सुभेदारवाडा कट्ट्यातर्फे पाच वर्षांपासून मोदकोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. ही स्पर्धा उकडीचे मोदक आणि इतर प्रकारचे मोदक बनवणे या दोन विभागात पार पडली. यामध्ये पहिल्या विभागात वृषाली बोराडे यांनी प्रथम क्रमांक, शोभा मराठे यांनी द्वितीय क्रमांक तर स्नेहा म्हस्के यांनी तृतीय क्रमांक पटकावला. तर दुसऱ्या विभागात कुसुम बडगुजर यांनी प्रथम क्रमांक, श्वेता बाम यांनी द्वितीय तर स्मिता तोरसकर या तृतीय क्रमांक पटकावला.

हेही वाचा… निवृत्त अभियंता सुनील जोशी यांच्या विभागीय चौकशीला मंजुरी; नांदिवली पंचानंद येथे तीन बेकायदा इमारती बांधल्याचे प्रकरण

या स्पर्धेचे परिक्षण डोंबिवलीतील कुलकर्णी ब्रदर्सचे श्रीपाद कुलकर्णी आणि परब किचन यू ट्यूब वाहिनीच्या स्नेहा परब यांनी केले. यावेळी सुभेदारवाडा कट्ट्याच्या अनिता जहागीरदार, कल्याण विकास फाऊंडेशनच्या हेमा पवार आणि इनरव्हील क्लब ऑफ कल्याणच्या प्रतिभा बडगुजर उपस्थित होते.

Story img Loader