ठाणे : महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या गावदेवी भूमिगत वाहनतळ, खाडी किनारा सुशोभिकरण, कळवा रुग्णालयातील विशेष प्रसुती कक्ष यासह पाच महत्वाच्या प्रकल्पांचे लोकार्पण शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. या लोकार्पण कार्यक्रमाच्यानिमित्ताने मुख्यमंत्री शिंदे यांचा शहराच्या विविध भागांत दोन तासांचा दौरा होणार असून, या दौऱ्यानिमित्ताने महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ठाणे महापालिकेत आतापर्यंत शिवसेनेची सत्ता कायम राहिली आहे. गेल्यावर्षी महापालिकेची पंचवार्षिक मुदत संपुष्टात आली. तेव्हापासून पालिकेत प्रशासकीय राजवट लागू आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास विभाग असून,त्यांच्या नेतृत्वाखालीच पालिकेचा कारभार सुरू आहे. त्यामुळे पालिकेत प्रशासकिय राजवट लागू असली तरी त्यावर शिवसेनेचे वर्चस्व कायम असल्याचे चित्र आहे. कळवा खाडी पूल, तसेच विविध प्रकल्प लोकार्पण कार्यक्रमाच्या निमित्ताने हे दिसून आलेले आहे. पालिकेच्या निवडणुका येत्या काही महिन्यांत लागण्याचे अंदाज वर्तविले जात असून या निवडणुकांच्या तोडांवर शहरातील प्रकल्प लोकार्पण कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवसेनेकडून शक्तीप्रदर्शन करण्यात येण्याची शक्यता आहे. ठाणे शहरातील पाच महत्वाच्या प्रकल्पांचे लोकार्पण शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असून त्यात किसननगर येथील २२ क्रंमांक रस्त्यावरील चौक सुशोभिकरण, गावदेवी भूमिगत वाहनतळ, विद्युत बसगाड्या, कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील विशेष महिला प्रसुती कक्ष या प्रकल्पांचा समावेश आहे. याशिवाय, कोपरी, कळवा, आणि कोलशेत या भागातील खाडी किनारी प्रकल्पांचेही लोकार्पण होणार आहे.

हेही वाचा – संथगती रस्ते, धूळ, कोंडीने डोंबिवलीकर त्रस्त; विद्यानिकेतन शाळेच्या बसवरील फलकाने वेधले लक्ष

असे आहेत प्रकल्प

गावदेवी भूमिगत वाहनतळ

ठाणे महापालिकेच्या स्मार्ट सिटी योजनेतून गावदेवी भूमीगत वाहनतळाची उभारणी करण्यात आलेली आहे. हे वाहनतळ ४ हजार ३३० चौरस मीटरचे असून, त्यामध्ये १३० चाकी वाहने, तर १२० दुचाकी वाहने उभी करण्याची सुविधा निर्माण करण्यात आली आहे. या ठिकाणी वाहनतळावरील मैदान पूर्ववत करून त्या ठिकाणी सुशोभिकरणाची कामे करण्यात आली आहेत. या प्रकल्पांमुळे स्थानक परिसरातील रस्त्यावर उभी राहणाऱ्या बेकायदा वाहतुकीला आळा बसणार असून, मुलांना खेळण्यासाठी मैदानाची सोय उपलब्ध झाली आहे.

खाडी किनारा सुशोभिकरण प्रकल्प

ठाणे शहराला ३२ कि.मी. लांबीचा खाडी किनारा लाभला आहे. या खाडीचे जतन, संवर्धन, स्वच्छता, जलक्रिडा, पर्यटन केंद्र अशा सोयी सुविधांचा विकास करण्यासाठी खाडी किनारा सुशोभिकरण प्रकल्प राबविण्यात येत आहे. ठाणे महापालिकेच्या स्मार्ट सिटी योजनेतून मुंब्रा बायपास ते खारेगाव टोलनाका, नागलाबंदर, कावेसर-बाघबीळ व कोलशेत साकेत- बाळकुम, कळवा-शास्त्रीनगर व कोपरी अशा ७ ठिकाणी हा प्रकल्प राबविण्यात येत असून, त्यापैकी कोलशेत साकेत-बाळकुम, कळवा-शास्त्रीनगर व कोपरी या प्रकल्पांचे लोकार्पण शनिवारी करण्यात येणार आहे. या सर्व प्रकल्पांमध्ये उद्यान, जॉगिंग ट्रॅक, चालण्यासाठी मार्गिका, सायकल मार्गिका, बैठक व्यवस्था, अम्मी थिएटर, मुलांना खेळण्याकरीता व्यवस्था, खुली व्यायाम शाळा, मनोरंजनात्मक सुविधा, गणेश विसर्जन घाट, दगडी भिंत, कुंपण भिंत, प्रसाधन गृहे, वाहनतळ, सीसीटीव्ही कॅमेरे, विद्युत व्यवस्था अशा सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा – ठाणे : अमली पदार्थांच्या प्रतिबंधासाठी परदेशी टपालावर नजर; एकाच पत्त्यावरून वारंवार येणाऱ्या टपालावर लक्ष ठेवण्याचे निर्देश

वीजेवरील बसगाड्या

केंद्र शासनाने स्वच्छ हवा उपक्रमांतर्गत दिलेल्या निधीतून पालिका पर्यावरण पुरक असलेल्या १२३ वीजेवरील बसगाड्यांची खरेदी करणार असून, त्यापैकी पहिल्या टप्प्यात ११ वीजेवरील बसगाड्या परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. याशिवाय, पालिकेने सीएनजी इंधनावरील २० बसगाड्यांची खरेदी केली आहे. अशा एकूण ३१ बसगाड्यांचे लोकार्पण शनिवारी करण्यात येणार आहे.

हेही वाचा – मेट्रो पाचच्या कारशेडचे भूसंपादन रखडलेल्या स्थितीतच; शेतजमिनीच्या दराबाबत अद्याप निश्चितता नाही

कळवा येथील महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात प्रसुती कक्ष आणि शस्त्रक्रिया विभाग नव्याने तयार करण्यात आले असून, अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असा हा विभाग तयार करण्यात आला आहे. या ठिकाणी अतिदक्षता विभागात ३२ खाटांची सुविधा निर्माण करण्यात आली आहे. या कक्षांचे लोकापर्ण होणार आहे.