लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कल्याण: बनावट वाहन क्रमांक वापरुन कल्याण परिसरात फिरून भिवंडीकडे जाणाऱ्या एका वाहन चालकाला बाजारपेठ पोलिसांनी शिताफिने गुरुवारी संध्याकाळी कोनगाव भागातून अटक केली. हा चालक वसई तालुक्यातील नारिंगी गावातील रहिवासी आहे.

कुंदन अनंत पाटील (३२, रा. नारिंगी गाव, चंदनसार, वसई) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याला वाहनासह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बकरी ईदनिमित्त गुरुवारी कल्याण मधील दुर्गाडी किल्ल्या जवळील दुर्गामाता चौकात पोलीस बंदोबस्त होता. यावेळी एक वाहन चालक संशयितरित्या कल्याण मधून भिवंडीकडे जात असल्याचे बाजारपेठ पोलिसांना दिसले.

हेही वाचा… डोंबिवलीत महावितरणकडून बेकायदा इमारतींना वीज पुरवठा, महावितरणच्या मुख्य अभियंत्याकडे तक्रार

पोलिसांनी संबंधित वाहन चालकाला थांबण्याचा इशारा केला. पोलिसांनी त्या वाहनाची कागदपत्र तपासली त्यावेळी संबंधित वाहनावरील वाहन क्रमांक बनावट असल्याचे आढळले. या मारुती सुझुकी वाहनाचा मूळ वाहन क्रमांक एमएच ०१ सीव्ही ४२६१ आहे. वाहन चालक कुंदन याने त्याऐवजी बनावट वाहन क्रमांकाची पट्टी वाहनाला लावली होती. हा प्रकार उघड होताच पोलिसांनी वाहन चालकाला ताब्यात घेतले. त्याने बनावट वाहन क्रमांक का वापरला. तो काही अवैध वाहतूक करण्यासाठी आला होता का, याचा तपास पोलीस करत आहेत. हवालदार गिरीश पवार यांच्या तक्रारीवरुन कुंदन पाटील विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vasai driver arrested in kalyan for using fake vehicle number dvr
Show comments