डोंबिवलीतील घरडा सर्कल ते वाशी दरम्यान दोन दिवसांपासून सुरू करण्यात आलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या वातानुकूलित बससेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
डोंबिवलीतील रस्त्यांची कामे सुरू असल्याने वाहतूक कोंडी नको म्हणून ही बस घरडा सर्कल येथून सोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. डोंबिवली, शिळफाटा, तुर्भे, बोनकोडेमार्गे ही बस वाशी सेक्टर १५ येथे पोहोचते. सकाळी सव्वा सात वाजता घरडा सर्कल येथून पहिली बस सुटते. वाशी येथून डोंबिवलीसाठी पहिली बस सव्वा आठ वाजता सुटते. डोंबिवलीतून संध्याकाळी सात वाजता आणि वाशीतून रात्री आठ वाजता शेवटच्या बस सुटतात. या बससाठी किमान भाडे १५ रुपये तर कमाल भाडे ६० रुपये आहे. दर अर्धा तासाने या बस सोडण्यात येत आहेत, असे परिवहन समिती सदस्य राजेश कदम यांनी सांगितले. या सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून डोंबिवली ते वाशी दरम्यान अधिकाधिक सेवा सुरू करा, अशी प्रवाशांची वाढती मागणी आहे.

Story img Loader