ठाणे : यंदा परतीचा पाऊस लांबल्यामुळे भाज्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होऊन त्यांचे उत्पादन घटले होते. पाऊस थांबल्यानंतर पुन्हा भाज्यांच्या पिकाची लागवड करण्यात आली. परंतु सध्या राज्यात सर्वत्र थंडीची लाट पसरली आहे. हे वातावरण भाज्यांच्या वाढीस पूरक नसल्यामुळे भाजी काढणीसाठी तयार होण्यास विलंब होत आहे. त्यामुळे बाजारात काही भाज्यांची आवक घटली असून त्यांच्या दरात वाढ झाल्याचे चित्र आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नवी मुंबई येथील वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत पुणे, जुन्नर, नगर, सातारा, बारामती अशा विविध जिल्ह्यांतून भाज्या दाखल होतात. या बाजार समितीतून या भाज्या ठाणे, मुंबई तसेच उपनगरातील किरकोळ बाजारात विक्रीसाठी जातात. नियमित बाजार समितीत अंदाजे ५५० ते ६०० भाज्यांच्या गाड्या दाखल होत असतात. गेले काही दिवसांपासून बाजार समितीत दुधी भोपळा, गवार, कोबी, दोडका, वांगी, शेवगा या भाज्यांची आवक घटल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांच्या दरात १० ते २० टक्के वाढ झाली आहे. परिणामी, किरकोळ बाजारातही या भाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे.
हेही वाचा >>> जिल्ह्यात हवेची गुणवत्ता मध्यम; तर खासगी हवेच्या निर्देशांकानुसार हवेची गुणवत्ता वाईट
सध्या राज्यात सर्वत्र थंडीची लाट पसरली आहे. हे वातावरण काही भाज्यांच्या वाढीसाठी पूरक नसल्यामुळे या भाज्यांची वाढ होण्यास विलंब होत आहे. त्यामुळे भाज्यांचे उत्पादन घटल्याची माहिती नवी मुंबईचे घाऊक भाजीपाला व्यापारी महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब बडदे यांनी दिली.
हेही वाचा >>> डोंबिवलीत व्हीव्हीपॅटमधील मते पुनर्मोजणीसाठी दीपेश म्हात्रे यांनी भरली चार लाखाची रक्कम
चौकट भारतात लसणाचे पीक झाले नसून इजिप्त आणि अफगाणिस्तान या देशांतून लसणाची आयात केली जात आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा लसणाची साठवण कमी आहे. मागील वर्षी १० ते २० प्रतिकिलो रुपयांनी बाजार भावाने लसूण विक्री केला जात होता. त्यामुळे यंदा अनेक शेतकऱ्यांनी लसणाचे पीक घेतले नसल्याने भारतात लसणाची आवक घटली आहे. वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज अडीच ते तीन हजार नग लसूण येत आहे. घाऊकात २०० ते ३०० प्रति किलो रुपयांनी लसूण विकला जात आहे. १५ जानेवारीनंतर मध्य प्रदेश येथून लसूण आयात होईल. त्यानंतर लसणाचे दर कमी होतील, अशी माहिती वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा – बटाटा बाजार विभागातील साहाय्यक सचिव बाळासाहेब टावरे यांनी दिली.
सध्या मोठ्या प्रमाणात शेतमाल हा स्थानिक बाजारात विक्री केला जात आहे. त्यामुळे बाजार समितीत भाज्यांची आवक घटल्याची माहिती वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी बाजारचे उपसचिव मारुती पबितवार यांनी दिली.
भाज्यांचे दर (प्रति किलो)
भाज्या घाऊक किरकोळ
१५ दिवसांपूर्वी आता १५ दिवसांपूर्वी आता
दुधी भोपळा २० ३० ४० ५०
गवार ६० ७२ ८० १२०
कोबी २२ ३० ४० ६०
दोडका ४० ४८ ६० ८०
वांगी २६ ३४ ६० १२०
शेवगा ८० १६० १०० १८०