ठाण्यात धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर रुग्णालय आणि त्रिमंदिर संकुलाच्या भूमिपूजन कार्यक्रमात उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे. देशाचा जीडीपी जैन समाजाजवळ आहे, असं ते म्हणाले. तसंच, यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या कार्याचा गौरव करत राष्ट्रीय स्वयंसवेक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचेही मार्गदर्शनानिमित्त आभार मानले.

“धर्मवीर आनंद दिघे या संपूर्ण भागात सेवा कार्य करायचे, दुर्गम भागातील आदिवासी देखील त्यावेळी त्यांच्या अॅम्ब्युलन्स सेवेमुळे वाचला आहे. त्या काळात गोर-गरीब माणसाला सेवा मिळाली पाहिजे, हा प्रयत्न त्यांनी सातत्याने केला. एका राजकीय नेत्यापेक्षाही सेवा करणारा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. त्यांचीच परंपरा एकनाथ शिंदे यांनी चालवली. बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं त्याप्रमाणे ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या सूत्रातून हे कार्य होतंय”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Kangana Ranaut criticism that Priyanka Gandhi has no respect for democracy
प्रियंका गांधीना लोकशाहीचा आदर नाही,कंगना रानौतची टीका..
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Sanju Samson meets Female Fan After Match Who Injured by His Massive Six Watch Video IND vs SA
संजू सॅमसनच्या ‘त्या’ कृतीने जिंकली चाहत्यांची मनं, षटकारामुळे घायाळ झालेल्या चाहतीची घेतली भेट अन्…, पाहा VIDEO
navneet rana daryapur rada
VIDEO : अमरावतीत नवनीत राणांच्या प्रचारसभेत राडा; माजी खासदारावर हल्ल्याचा प्रयत्न!
black leopard maharashtra
Video: महाराष्ट्रात वाढताहेत काळे बिबट…
Emotional message for father
“डोळ्यातले अश्रु डोळ्यांतच जिरवण्याची ताकद फक्त ‘बापाकडे’ असते” तरुणाची पाटी होतेय व्हायरल, VIDEO एकदा पाहाच
nitish kumar bows down to touch feet of pm modi
VIDEO: भरसभेत नितीश कुमार पाया पडायला गेले अन् नरेंद्र मोदींनी…; नेमकं काय घडलं?

“अजय आशर यांच्याकडून ‘जितो’च्या माध्यमातून चांगलं काम होतंय. कॅन्सर रुग्णालय बनवायला घेतलं आहे. यांच्या पाठिमागे जितो आहे, ज्यांच्या पाठिमागे जैन समाज आहे त्यांना संसधानाची गरज पडत नाही. देशाचा जीडीपी जैन समाजाजवळ आहे. त्यांच्या श्रमातून, त्यांच्या मेहनतीतून उभा केला आहे. केवळ पैसा कमवायचा नाही तर ते पैसा सेवेमध्ये द्यायचा, असं प्रिन्सिपल जैन समाजामध्ये पाहायला मिळतं. त्यामुळे देशभरामध्ये, खूप मोठ्या प्रमाणात सेवाकार्य होतं”, असंही फडणवीस म्हणाले.

“कॅन्सर एक असा रोग आहे, दुर्दैवाने या रोगामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होतेय. गेल्या दहा वर्षांत कॅन्सरच्या रुग्णांमध्ये २५ टक्क्यांची वाढ झाली, तर मृतांमध्ये २० टक्क्यांची वाढ झाली आहे. २०३५ पर्यंत कॅन्सरच्या केसेस मोठ्या प्रमाणात वाढतील. जगात दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत जास्त किलर रोग कॅन्सर आहे. कॅन्सर हा व्यक्तीला होतो, पण त्रास परिवाराला होतो. लांब आणि खर्चिक ट्रिटमेंट असते. त्यामुळे परिवाराचं आर्थिक संतुलन बिघडतं. देशाच्या श्रमशक्तीवरही याचा विपरित परिणाम होतो. आज अभिमानाची गोष्ट आहे टाटा कॅन्सरसाखं हॉस्पिटल मुंबईत आहे, त्यांनी अविरत सेवा दिली. ते केवळ सेवा करतात असं नाही, देशात कुठेही कॅन्सर हॉस्पिटल सुरू करायचं असेल तर सर्व प्रकारची मदत टाटा रुग्णालयाकडून केली जाते. याही ठिकाणी कॅन्सर हॉस्पिटल सुरू होतंय, ते टाटाच्या मार्गदर्शनाखाली तयार होतंय.

आस्था आणि मानवतेचं मंदिर आजूबाजूला होतंय. त्रिमंदिरातून आस्था, श्रद्धा, विश्वास आणि ताकद मिळेल. दुसरीकडे कॅन्सर रुग्णालयातून उपचार मिळेल. या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये आलेला रुग्ण बरा होऊनच जाईल, अशी प्रार्थना करतो.