पैशांचे गैरव्यवहार रोखण्यासाठी पोलीस सज्ज; चारचाकींबरोबरच दुचाकींचीही तपासणी
विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर ठाणे जिल्ह्य़ामध्ये ४०हून अधिक ठिकाणी उभारण्यात आलेल्या नाक्यांवर गेल्या काही दिवसांमध्ये १ कोटी ४ लाख ३० हजार ८५० रूपये रोकड जप्त करण्यात आली असून आज, शनिवार सायंकाळी प्रचाराची मुदत संपल्यानंतर पुढील ७२ तास वाहनांची कसून तपासणी केली जाणार आहे. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये तपासणी नाक्यावर केवळ चारचाकी वाहनांची तपासणी केली जात होती. यंदा मात्र पहिल्यांदाच अशाप्रकारे दुचाकीची तपासणी केली जात आहे. त्यामुळे निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैसे आणि मद्याचे वाटप करू पाहाणाऱ्यांची नाकाबंदी करण्याची तयारी सध्या सुरू आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी येत्या सोमवारी मतदान होणार आहे. तसेच निवडणुकीच्या प्रचाराची मुदत आज, शनिवार सायंकाळी ६ वाजता संपणार आहे. प्रचाराची मुदत संपल्यापासून ते मतदानाच्या दिवसापर्यंत म्हणजेच ७२ तासांच्या कालावधीत उमेदवारांकडून छुपा प्रचार होण्याची शक्यता असते. अशा प्रचारादरम्यान मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैसे, मद्य तसेच वस्तूंचे वाटप करण्यात येते. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये असे प्रकार उघडकीस आले आहेत. या पाश्र्वभूमीवर निवडणूक विभाग आणि पोलिसांनी जिल्ह्य़ात ४०हून अधिक ठिकाणी वाहन तपासणी नाके उभारले आहेत. या नाक्यांवर वाहनांची तपासणी केली जाते. त्यामध्ये वाहनांमधून पैसे, मद्य तसेच अन्य वस्तूंची छुप्या पद्धतीने वाहतूक होते का, याची पाहणी केली जाते. गाडीमध्ये सापडलेल्या रोख रक्कमेबाबत चालकाला माहिती देता आली नाही तर त्याला पथकाकडून ताब्यात घेतले जात आहे.
दुचाकीस्वार रडारवर
तपासणी नाक्यांवर चारचाकी वाहने अडवून त्यांची तपासणी केली जाते, मात्र पैशाची ने-आण करण्यासाठी मोठय़ा वाहनांच्या तुलनेत दुचाकींचा मोठा वापर सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून दुचाकी तपासणीला वेग आला असून पुढील ७२ तासांत नाक्यानाक्यांवर यासाठी तपासणी नाके तयार करण्यात आले आहेत. दुचाकी वाहनांच्या आसनाखाली असलेल्या मोकळ्या जागेत पैसे, मद्यसाठय़ाची वाहतूक होऊ शकते, असा पोलिसांना संशय आहे.