अविनाश जाधव यांना मिळालेल्या ७१ हजार मतांमुळे भाजप अवाक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

लोकसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या सुमारे ८३ हजाराच्या मताधिक्यावर विसंबून रहात यंदाही मोठय़ा विजयाची खात्री बाळणाऱ्या भाजपला ठाणे विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून जोरदार धक्का दिल्याची चर्चा आता रंगली आहे. भाजपचे विद्यमान आमदार संजय केळकर  यांनी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अविनाश जाधव यांना २० हजारांपेक्षा अधिक मतांनी पराभूत केले असले तरी या मतदारसंघातील भाजप-शिवसेनेची ताकद लक्षात घेता हा विजय फारच तोकडा ठरल्याची भावना आता भाजपच्या गोटात व्यक्त होऊ लागली आहे. विशेष म्हणजे, या संपुर्ण मतदारसंघात मनसेचा एकही नगरसेवक नसताना पक्षाला मिळालेल्या ७१ हजार मतांमुळे भाजप नेत्यांना घाम फुटला आहे.

पाच वर्षांपुर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे केळकर यांनी या मतदारसंघातून शिवसेनेचे रिवद्र फाटक यांचा १२ हजार मतांनी पराभव केला होता. हा मतदारसंघ शिवसेनेचा एकेकाळचा बालेकिल्ला . मात्र, फाटक यांना उमेदवारी देऊन शिवसेनेने  पायावर धोंडा मारुन घेतला. सुसंस्कृत उमेदवार म्हणून केळकर यांच्या पारडय़ात ठाणेकरांनी मतांचे दान टाकले. त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणुकीतही ठाण्याच्या मध्यवर्ती भागातून शिवसेनेला धक्का देत भाजपने मुसंडी मारली. या पराभवाचे शल्य शिवसेनेच्या मनात कायम होते. भाजप-शिवसेनेच्या जागा वाटपाच्या बोलणीत ठाण्याची जागा शिवसेनेला मिळावी असा शिवसैनिकांचा आग्रह होता. महापालिकेतील सभागृह नेते नरेश म्हस्के यांचे नाव येथून सतत चर्चेत होते. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आग्रहापुढे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याची जागा सोडली आणि शिवसेनेतील तळागाळाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केळकर यांच्यासाठी ठाणे शहरात घेतलेल्या सभेत या नाराजीचे प्रतिबिंब अगदी स्पष्टपणे उमटले. लोकसभा निवडणुकीत विचारे यांना ८३ हजाराचे मताधिक्य होते. त्यामुळे केळकर सहज विजयी होतील अशीच भाषा भाजप नगरसेवक आणि पदाधिकारी यांच्या तोंडी असायची. पक्षाच्या प्रचार सभेत, रॅली यामध्येही शिवसेनेचे तुरळक अपवाद सोडले तर फारसे कुणाला विश्वासात घेतले जात नसल्याची नाराजी दबक्या आवाजात बोलून दाखवली जात होती. या सगळ्याचा एकत्रित फटका केळकर यांना बसल्याची आता चर्चा असून शिवसेनेतील नाराज मतदार आणि मनसेकडून करण्यात आलेला आक्रमक प्रचार यामुळे बालेकिल्ला असूनही ठाण्यात भाजपला अपेक्षीत मताधिक्य गाठता आले नसल्याची चर्चा आहे.

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यांमध्ये भाजप पिछाडीवर

ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात  पाचपाखाडी, टेकडी बंगला, बाळकूम, कोलशेत तसेच घोडबंदरच्या काही पट्टयात शिवसेनेची मोठी ताकद आहे. या भागातून केळकर यांना अपेक्षीत मताधिक्य मिळाले नसल्याच्या तक्रारी आता भाजपचे पदाधिकारी करु लागले आहेत. याशिवाय राबोडी तसेच आसपासच्या परिसरात राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला आणि सुहास देसाई यांची ताकद आहे. या दोघांनीही अविनाश जाधव यांना पुरेपूर साथ दिल्याचे निकालावरुन स्पष्ट होत आहे. नौपाडा, विष्णुनगर, ब्राम्हण कॉलनी या पट्टयातून केळकर यांना चांगले मताधिक्य मिळाल्याने त्यांचा विजय सुकर झाला. मात्र, लोकसभा निवडणुकीतील मोठय़ा विजयाच्या आसपासही त्यांना येता आले नसल्याने भाजपच्या गोटात आता आत्मचिंतन सुरु झाले आहे.

ठाणे विधानसभा मतदारसंघात भाजपचा विजय झाला ही समाधानाची बाब असली तरी युती असूनही लोकसभेच्या तुलनेत मताधिक्य का कमी झाले याची समिक्षा करावी लागेल. मनसेचा या मतदारसंघात एकही नगरसेवक नसताना या पक्षाच्या उमेदवाराला ७१ हजार मते मिळतात हे आश्चर्यकारक आहे. – संदीप लेले, शहराध्यक्ष भाजप