ठाणे : विद्यादान सहाय्यक मंडळाचे संस्थापक व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भाऊ उर्फ श्रीराम नानिवडेकर यांचे सोमवारी वृध्दापकाळाने निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात हेमंत, प्रशांत ही मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. यांत्रिक अभियंता म्हणून भाऊ यांनी वयाच्या ६० व्या वर्षी स्वेच्छानिवृत्ती घेतली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बाबा आमटे यांच्या आनंदवन आणि हेमलकासा येथील कामे पाहून ते प्रभावित झाले होते. आनंदवन व हेमलकासा प्रकल्पांना मदत करता यावी यासाठी त्यांनी २००३ मध्ये आनंदवन स्नेही मंडळाची स्थापना केली. आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या मुलांना  उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी २००८  मध्ये विद्यादान सहाय्यक मंडळाची स्थापना केली. या मंडळाद्वारे अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आले. ठाणे महापालिकेने ठाणे गौरव हा पुरस्कार देवून त्यांना सन्मानित केले होते. सोमवारी भाऊ नानिवडेकर यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले.