पाकिस्तानातील सिंध प्रांतातून आलेल्या आणि ठाण्यामध्ये स्थायिक झालेल्या निर्वासितांच्या मुलांसाठी सुरू झालेल्या ‘विद्यासागर एज्युकेशन’ शाळेचा अमृत महोत्सव नुकताच गडकरी रंगायतनमध्ये साजरा झाला. संस्थेच्या वतीने नवी इमारत आणि महाविद्यालयासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार अमृत महोत्सवी कार्यक्रमामध्ये व्यक्त करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनीही या प्रयत्नांना मदत करण्याचे अश्वासन दिले.
ठाण्याचे जिल्ह्य़ांचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, शिक्षण अधिकारी अशोक मिसाळ, इनरव्हील क्लबच्या उपाध्यक्षा डॉ. संध्या भटनागकर आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी विद्यासागर एज्युकेशन सोसायटीचे आजी-माजी विद्यार्थी, पालकवर्ग, शिक्षकवर्ग, इनरव्हील क्लबचे सदस्य मोठय़ा प्रमाणात उपस्थित होते.
अमृत महोत्सवी कार्यक्रमामध्ये शाळेचे विश्वस्त वीणा भाटिया यांनी शाळेच्या आजपर्यंतच्या वाटचालीचा मागोवा घेतला. पाकिस्तानातील सिंध प्रांतातून आलेले नागरिक ठाण्यात स्थायिक झाले होते. त्यांच्या मुलांसाठी सिंधी माध्यमातून १९४९ मध्ये कोलशेत विभागात विद्यासागर शाळेची सुरुवात झाली. १९५५ मध्ये शाळेचे कोपरी कॉलनी येथे स्थलांतर झाले. १९७७मध्ये विद्यासागर शाळेच्या शिक्षक वर्गाने सोसायटी स्थापन करून शाळेचे व्यवस्थापन चालवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शाळेचे शिक्षकवर्ग आणि माजी विद्यार्थी शाळेचे विश्वस्त बनले. सिंधी माध्यमात शिकणाऱ्या मुलांची संख्या ्रकमी झाल्याने या शाळेचे हिंदी माध्यमिक शाळेत परिवर्तन करण्यात आले. या शाळेच्या प्राथमिक विद्यालयास शासनाचे अनुदान मिळत असून कोपरी विभागात एकही उच्च मााध्यमिक शाळा नाही. त्यामुळे विद्यासागर शाळेला नवी इमारत मिळाल्यास माध्यमिक शाळेस महाविद्यालयात रुपांतरीत करता येऊ शकेल, असा विश्वास भाटिया यांनी व्यक्त केला.

विद्यासागर एज्युकेशन या शाळेचा इतिहास मोठा असून तो जपण्याची गरज आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून या शाळेची नवी इमारत उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे     – एकनाथ शिंदे.

Story img Loader