ठाणे – गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे भातसा धरणातील पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे. या वाढत्या पाणी पातळीमुळे धरणाची वक्रदारे येत्या काही दिवसांत उघडण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे भातसा नदी किनाऱ्यावरील सायगाव पुल तसेच सापगाव व नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शुक्रवारी सकाळी ८ वाजता भातसा धरणाची पाणी पातळी १४०.२४ मी. एवढी असून भातसा जलाशय साठा ९४.९६७ मी. इतका झाला आहे. या धरण क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. यामुळे भातसा धरणाची पाणी पातळी, जलाशय परीचलन सुचीनुसार नियमित करण्यासाठी भातसा धरणाचे वक्रदारे येणाऱ्या काही दिवसात उघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. भातसा धरणातून काही प्रमाणात पाण्याचा विसर्ग प्रवाहीत होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भातसा नदीच्या किनाऱ्यावरील विशेषतः शहापूर मुरबाड रस्त्यावरील सायगाव पुल, सापगाव आणि नदी काठावरील इतर गावांतील सरपंच, तलाठी, ग्रामसेवक आणि नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नदीतील पाण्याच्या पातळी वाढ होण्याची आणि या पाण्याच्या प्रवाहात पोहण्यासाठी उतरू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबतची माहिती भातसा धरण व्यवस्थापन विभागातर्फे देण्यात आली आहे.