डोंबिवली : डोंबिवली जवळील एका गावात एका खासगी शिकवणी चालिकेच्या भावाने शिकवणी वर्गासाठी येत असलेल्या एका आठ वर्षाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार कायद्याने तात्काळ गुन्हा दाखल केला. संबंधित इसमाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला कल्याण जिल्हा व न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक राम चोपडे यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वैभव जितेंद्र सिंंग (१९) असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. बालिका आपल्या कुटुंबीयांसह राहते. नेहमीप्रमाणे बालिका आपल्या घर परिसरात असलेल्या खासगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षिकेच्या घरी गेली होती. संध्याकाळच्या वेळेत हे शिकवणी वर्ग घेतले जातात. बुधवारी बालिका शिक्षकेच्या घरी गेल्यावर तेथे खासगी शिकवणी चालिका नव्हत्या. त्या बाहेर गेल्या होत्या. त्यांचा भाऊ वैभव घरी होता.

हेही वाचा…कोल्डप्ले संगीत कार्यक्रमाला लहान मुलांना घेऊन जाण्यावर निर्बंध; जिल्हा प्रशासनाकडून आयोजकांना सूचना

घरात कोणी नाही पाहून वैभव यांनी बालिकेचा हात पकडून तिला शयनगृहात नेले. तेथे तिच्या मनाविरुध्द जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. बालिकेने त्यास प्रतिकार केला. पण वैभवने तिचे ऐकले नाही. घडल्या प्रकाराने बालिका घाबरली होती. हा प्रकार कोणाला न सांगण्याची तंबी वैभवने बालिकेला दिली.बालिका घरी आल्यावर तिने खासगी शिकवणी वर्गात घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला. हा प्रकार ऐकून पालक हादरले. त्यांनी तातडीने मानपाडा पोलीस ठाण्यात वैभव सिंग विरुध्द तक्रार केली.

हेही वाचा…सव्वाकोटीचे भाडे थकविल्यामुळे कल्याणमधील बोरगावकरवाडी वाहनतळ पालिकेच्या ताब्यात

पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल करून घेतला. तातडीने वैभवला त्याच्या राहत्या घरातून अटक केली. त्याला गुरुवारी कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. साहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राम चोपडे, पोलीस उपनिरीक्षक प्रियंका सादळकर याप्रकरणाचा तपास करत आहेत.