लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कल्याण: आंबिवली-मुरबाड पहिल्या रेल्वे मार्गातील पहिल्या टप्प्यातील सर्व्हेक्षणाला रेल्वे, शासकीय अधिकाऱ्यांकडून सुरूवात करण्यात आली आहे. अशा सर्व्हेक्षणाला आंबिवली, मोहिली येथील ग्रामस्थांनी विरोध करुन अधिकाऱ्यांना परत पाठविले. योग्य मोबदला देण्याचे लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत विरोध कायम राहिल असा इशारा ग्रामस्थांनी दिला.

रस्ते विकास कामांमध्ये अडथळे उभे करुन वाढीव मोबदला मिळण्यासाठीचे पेव शहापूर, मुरबाड, कल्याण तालुक्यात फुटले आहे. गाव हद्दीतील अनेक रस्ते, विकास कामे यामुळे रखडली आहेत. शासनाकडून रेल्वे, रस्ते मार्ग, प्रकल्पासाठी भूसंपादन झाले की रग्गड मोबदला मिळतो हे नागरिकांना माहिती झाल्याने आता प्रत्येक ठिकाणी विकास कामांना विरोध करुन पदरात पाडून घेण्याची मोठी स्पर्धा जिल्ह्यातील नागरिकांमध्ये लागली आहे.

आणखी वाचा- ठाण्यातील शौचालय कामांचे होणार त्रयस्थ संस्थेकडून परीक्षण

डोंबिवलीतील बाह्यवळण रस्त्याचा मोठागाव, कोपर, आयरे, कोपर, काटई, हेदुटणे चार ते पाच किमीचा पट्टा मागील सहा वर्षापासून ग्रामस्थांनी मोजणी करुन न दिल्याने रखडला आहे. या रखडलेल्या कामांचा फटका वाहन कोंडीच्या माध्यमातून नागरिकांना बसत आहे.

आंबिवली-मुरबाड रेल्वे मार्गासाठी अर्थसंकल्पात ९० कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या २१ किमीच्या पहिल्या टप्प्यातील जमीन भूसंपादनासाठी, मार्गिका निश्चितीसाठी रेल्वे अधिकारी, शासकीय भूमापन अधिकाऱ्यांनी सुरुवात केली आहे. मोहने येथील नायलॉन प्लान्ट जवळून मुरबाड रेल्वे मार्ग प्रस्तावित आहे. रेल्वेचा मार्ग एनआरसी कंपनीच्या काही जागेतून जात आहे. या कंपनीसाठी आंबिवली, मोहने भागातील ग्रामस्थांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या. या कंपनीतील कामगारांची थकीत देणी कंपनीकडे आहेत. कंपनी अनेक वर्षापासून बंद आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. जोपर्यंत कामगारांच्या थकीत देण्याचा निकाल लागत नाही, तोपर्यंत कंपनीतील जागेचे सर्व्हेक्षण करु दिले जाणार नाही, अशी आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.

आणखी वाचा-कोपरीत दुषित पाण्याच्या पुरवठा, नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची चिन्हे

आमचा विरोध रेल्वे मार्गाला नाही. आम्हाला आमच्या जमिनीचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. कल्याण-कसारा रेल्वे मार्ग चौपदरीकरणासाठी शासनाने आम्हाला मोबदला दिला नाही. जोपर्यंत शासनाकडून योग्य मोबदला देण्याचे लेखी आश्वासन दिले जात नाही तोपर्यंत मुरबाड रेल्वे मार्गासाठी जमीन भूसंपादित करुन दिली जाणार नाही, अशी भूमिका प्रकाश पाटील, सुरेश पाटील, प्रकाश भोईर, मंगल कुरले, एकनाथ पावशे, एकनाथ पाटील यांनी ग्रामस्थांच्यावतीने घेतली आहे. ग्रामस्थांचा विरोध पाहून पोलिसांना पाचरण करण्यात आले होते. त्याचा उपयोग झाला नाही. पोलिसांनी ग्रामस्थ, अधिकारी यांनी सामंजस्याने काम करण्याची सूचना केली.