ठाणे : माझ्यावर उपचार करणारे डाॅक्टर आणि कर्मचारी देव आहेत. मी चालू शकतो, हे त्यांनी मला दाखवून दिले. चालताना पायाचे स्नायू दुखतात. पण मी धावायला तयार आहे. मी एकप्रकारे जिंकलो आहे अशी प्रतिक्रिया माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांनी पत्रकारांशी बोलता दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी हे मागील काही दिवसांपासून आजारी आहेत. माजी क्रिकेटपटू आणि त्यांचे मित्र सचिन तेंडुलकर यांच्यासोबत संवाद साधताना त्यांचे एक चित्रीकरणही समाजमाध्यमांवर प्रसारित झाले होते. तेव्हापासून त्यांच्या प्रकृतीविषयी विविध चर्चा होत होत्या. शनिवारी त्यांना भिवंडी येथील काल्हेर भागातील आकृती या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. कांबळी यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील आकृती रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर उपचार करत असून आवश्यक सर्व चाचण्या केल्या जात आहेत. कांबळी यांना चालताना त्रास होतो. त्यांना डोकेदुखी, ताप, पोटदुखी आणि इतर आजाराच्या तक्रारी आहेत असे डाॅक्टरांनी सांगितले.

हेही वाचा – मराठी कुटुंबांना मारहाण करणाऱ्या मुख्यसुत्रधारासह मारेकऱ्यांना ‘मोक्का’ लावा, मराठी कुटुंबीयांची पोलिसांकडे मागणी

विनोद कांबळी हे उपचारानंतर म्हणाले की, माझ्यावर उपचार करणारे डाॅक्टर आणि कर्मचारी देव आहेत. मी चालू शकतो, हे त्यांनी मला दाखवून दिले. मी धावायला तयार आहे. चालताना पायाचे स्नायू दुखतात. मी एकप्रकारे जिंकलो आहे, अशी प्रतिक्रिया विनोद कांबळी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

हेही वाचा – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव आमची पॅशन – जितेंद्र आव्हाड

विनोद कांबळी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी त्यांना संसर्ग, ताप, रक्तदाब कमी झाला होता. यामुळे त्यांची प्रकृती खराब झाली होती. आता त्यामध्ये बरीच सुधारणा झाली आहे. त्यांच्या एक-दोन काही चाचण्या करायच्या आहेत. त्यासाठी न्यूरोलाॅजीस्टशी आमचे बोलणे झाले आहे. त्यांच्यासाठी आवश्यक तपासण्या सुरू केल्या आहेत. त्यांना पाच ते सहा दिवस उपचारासाठी रुग्णालयात ठेवावे लागणार आहे, अशी माहिती आकृती रुग्णालयाचे डाॅ. विवेक द्विवेदी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.