कल्याण – येथील चक्कीनाका भागातील अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिची हत्या करणाऱ्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या विशाल गवळीला गुरुवारी सकाळी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने हजर केले. यावेळी न्यायालयाने विशालला दोन जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. यावेळी विशालची पत्नी साक्षीला हिलाही दोन जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. ए. पत्रावळे यांच्या समोर विशाल, पत्नी साक्षी यांना गुरुवारी सकाळी पोलिसांकडून हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने या गुन्ह्याचे स्वरुप पाहून आणि पोलिसांना या प्रकरणात अधिकचा तपास करायचा असल्याने विशाल, साक्षी गवळी यांना २ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

हेही वाचा >>>ठाणे : तीन हात नाका चौकात अंध – अपंगांसाठी सिग्नल यंत्रणा, देशातील पहिलाच प्रयोग

विशाल गवळीला कल्याणमधील कोणत्याही पोलीस ठाण्यातील कोठडीत ठेवले तर तेथे त्याचे समर्थक, नातेवाईक, माध्यमे यांचा गराडा पडण्याची शक्यता पोलिसांनी वाटली. सुरक्षेचा उपाय म्हणून विशालला ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यातील कोठडीत गुरुवारी सकाळी ठेवण्यात आले होते. चक्कीनाका येथील मुलीची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह विशालने पत्नी साक्षी गवळी हिच्या सहकार्याने आणि एका रिक्षेतून कल्याण पडघा रस्त्यावरील बापगाव हद्दीत रात्रीच्या वेळेत फेकून दिला होता. मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर विशालने आधारवाडी चौक येथील एका दुकानातून श्रमपरिहारासाठी मद्याची बाटली खरेदी केली. पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाटी रात्रीतून तो पत्नीचे माहेर असलेल्या बलुढाणा जिल्ह्यातील शेगाव भागात पळाला होता.

हेही वाचा >>>साक्षरतेने भ्रष्टाचारात वाढ : नेमाडे

ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, अपर पोलीस आयुक्त संजय जाधव, उपायुक्त अतुल झेंडे यांनी याप्रकरणाचा तातडीने तपास सुरू करून सहा पोलीस पथके विशाल गवळीला अटक करण्यासाठी नियुक्त केली होती. विशाल फरार झाल्यानंतर पोलिसांनी विशालची पत्नी साक्षी आणि विशालच्या इतर दहा नातेवाईकांना विशालचा थांगपत्ता विचारण्यासाठी ताब्यात घेतले. यामध्ये पत्नी साक्षीने विशाल बुलढाणा येथे गेल्याची माहिती पोलिसांना दिली.

ही माहिती तातडीने कल्याण पोलिसांनी बुलढाणा येथील शेगाव पोलिसांना दिली. शेगाव येथे पेहराव बदलून पळण्याच्या प्रयत्नात असलेल्या विशाल गवळीला शेगाव पोलिसांनी केशकर्तनालयातून अटक केली. त्याचा ताबा नंंतर ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी रात्री घेतला. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी विशालचा ताबा शेगाव पोलिसांकडून घेतल्यानंतर तातडीने कल्याणच्या दिशेने निघाले.

अल्पवयीन मुलीची हत्या गुन्हेगार पार्श्वभूमीच्या विशालने केल्याने कल्याण, डोंबिवली परिसरात नागरिक, विविध राजकीय पक्षांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. बुलढाणा येथून आणलेल्या विशालला कल्याणला न आणता थेट त्याला ठाणे येथे नेण्यात आले.

(विशाल गवळी)